mandul 1234.jpg 
नाशिक

मोठी बातमी : अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

नाशिक / येवला : आजही गुप्तधन मिळवण्यासाठी मांडूळ,घरात पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर कासवाची पूजाविधी करण्याची अंधश्रद्धा समाजात आहे. तसेच सेक्स,सौंदर्यप्रसाधनेसाठी देखील याची खरेदी-विक्री लाखात,कोटीत होत असल्याच्या घटना घडल्या असून अशा चर्चा या घटनेने उघड केली आहे. येथील सुरुवात सत्यगाव पासून झाली,मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाला वाचा फुटली.

राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश

सत्यगाव येथून धागेदोरे सापडलेल्या मांडूळ तस्करीचे राज्यस्तरीय रॅकेटपर्यत वनविभागाचे अधिकारी पोहोचले आहे. या तपासातून मांडूळासह कासवाच्या तस्करीचे राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश झाला असून गंभीर म्हणजे यात एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिसाचा यात सहभाग उघड झाला आहे. सहभागी असलेल्या 19 जणांना अटक करण्यात आली असून नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात या प्रकाराचे लोण आढळले आहे. अद्यापही राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय तस्करीचा सहभागाचा शोध अधिकारी घेत असून हे वन्यजीव काही कोटीत विक्री होत असल्याची चर्चा आहे.

...अन् या प्रकरणाला वाचा फुटली.
आजही गुप्तधन मिळवण्यासाठी मांडूळ,घरात पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर कासवाची पूजाविधी करण्याची अंधश्रद्धा समाजात आहे. तसेच सेक्स,सौंदर्यप्रसाधनेसाठी देखील याची खरेदी-विक्री लाखात,कोटीत होत असल्याच्या घटना घडल्या असून अशा चर्चा या घटनेने उघड केली आहे.येथील सुरुवात सत्यगाव पासून झाली,मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व सहकाऱ्यांनी सत्यगाव येथे धाड टाकून लपवलेले मांडूळ 1 जूनला पकडल्यानतर या प्रकरणाला वाचा फुटली. घरावर छापा मारून मांडूळसह संशयित आरोपी सोमनाथ रामनाथ पवारसह एकाला ताब्यात घेण्यात आले होते.त्याला ज्यांनी मांडूळ पकडण्यासाठी सांगितले त्यांची नावे समजल्यावर दक्षता पथकाचे दोन स्वतंत्र पथके करून वडाळीभोई येथून प्रकाश बर्डे,संदीप बर्डे या त्याच्या नातेवाईकाना अटक करण्यात आली.

वनविभागाने रचला सापळा
या मांडूळाची विक्री देवळाली कॅम्प भागातील अंबादास बापु कुवर व धर्मा देवराम जाधव यांना होणार होती,त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेतले.त्यांच्याकडून संतोष बाळकिसन कचोळे व किरण पांडुरंग सोनवणे (रा. म्हरळ व मनेगाव,ता.सिन्नर) यांची नावे उघड झाली. पथकाने त्यांनाही 4 जून रोजी अटक करून न्यायालयाकडून त्यांची वनकोठडी घेतल्यानंतर कसून चौकशी केली असता हे रॅकेट नगर जिल्ह्यात पोहोचले.सापळा रचून वनविभागाचे
ज्ञानेश्वर वाबळे (राहता) व निखिल गायकवाड (कोल्हार) यांना अटक केली. असता निखील गायकवाड यांच्याकडे विक्रीसाठी एक कासव मिळून आले. अटकेतील आरोपींच्या तपासा आधारे इच्छामणी हॉटेल (सिन्नर पुणे हायवे) येथे मांडूळ विक्रीची माहिती मिळाल्यावर वनअधिकारी व कर्मचारी डमी ग्राहक बनून गेले व सहा व्यक्तीना सापळा रचून अटक केली.विक्रीसाठी आलेल्यामध्ये सहायल पोलीस निरिक्षक विश्वास चव्हाणके (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे) व पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दिपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात सहभाागी संशयित ज्ञानेश्वर वाबळे व निखिल गायकवाड (रा.कोल्हार),नीलेश रामदास चौधरी (रा.चाकण), संदीप तान्हाजी साबळे (रा.नारायणगाव), महेश हरिश्चंद्र बने (रा.अंबरनाथ), याच्या मुसक्या आवळल्या.

न्यायालयाने फॉरेस्ट कस्टडी
तपासात मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा डमी ग्राहक पाठवून बेलापूर (श्रीरामपूर) येथील मचिंद्र काळे व दानेश्वर गाडेकर (घोडेगाव) यांच्याकडून विक्रीला असलेले मांडूळ सापळा रचून जप्त केले. या सर्व प्रकारातील एकूण 19 संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयाने फॉरेस्ट कस्टडी दिली आहे.कासव,घुबड,मांडूळ यांच्या तस्करीचे राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय तस्करी संबंधी पुढील तपास सुरू आहे. मनमाडचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे,वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी,
बशीर शेख,वनपाल एम.बी.पवार,बी.जी.वाघ,पी.एस.पाटील तसेच वनरक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी या तपासात योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT