Leopard esakal
नाशिक

नाशिक : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश

भारत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील सतीश भाऊसाहेब मोगल यांच्या विहिरीत पडलेल्या नर जातीच्या ६ वर्षांच्या बिबट्याला (Leopard) विहिरीतून सुखरूप बाहेर काढत जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्याला पुढील तपासासाठी निफाड येथील नर्सरीत पाठविण्यात आले आहे.

दोन बिबट्यांची मोठी दहशत

गेल्या सोमवारीच १४ फेब्रुवारी रोजी मौजे सुकेणे येथील सोनवणी वस्तीवर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा सतीश मोगल यांच्या वस्तीवरील विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. या बिबट्याला पुढील तपासासाठी निफाड येथील नर्सरीत पाठविण्यात आले आहे. एकाच आठवड्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असले तरी परिसरात अद्यापही एक किंवा दोन बिबटे असल्याचा नागरिकांचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी सुकेणे चांदोरी रोडवरील रेल्वे गेट जवळील बाळासाहेब डेर्ले व विष्णू डेर्ले यांच्या वस्तीवर सायंकाळी सात वाजता बिबट्याने दर्शन दिले होते. त्यानंतर शनिवार पहाटे सहा वाजता सतीश मोगल यांच्या वस्तीवर पुन्हा बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. या दोन बिबट्यांमूळे परिसरात मोठी दहशत होती. अद्यापही काही बिबटे परिसरात असल्याने जास्तीचे पिंजरे लावावे व येथील वस्तीवरील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. वनविभागाचे अधिकारी वनपाल भगवान जाधव, अक्षय मेत्रे, वनरक्षक पंकज नागपुरे, वनमजुर भैया शेख ,चंद्रकांत गावित, बाळू जाधवा यांनी बिबट्याला ताब्यात घेतले आहे.

''पहाटे सहा वाजता विहिरीत खूप मोठा आवाज झाला, तेव्हाच लक्षात आले कि विहिरीत काहीतरी पडले आहे. विहिरीत बिबट्या पडल्याने त्वरित वन अधिकार्‍यांशी संपर्क करून त्यांना माहिती दिली. त्यानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.'' - सतीश मोगल, मौजे सुकेणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT