Dada Bhuse news esakal
नाशिक

Dada Bhuse: नाफेडच्या कांदा खरेदी नियमावलीत अडचणी; केंद्राला बदल करण्यास सांगू

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्या, पाणी टंचाई आणि लंपी रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सर्वांसमोर मांडल्या आहेत. यावेळी कांदा प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यात यावा असा आग्रह त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचा कांदा नाफेडमार्फत खरेदी करण्यात यावा यासाठी केंद्राकडे नियमांमध्ये बदल कऱण्याची मागणी करणार असल्याचे भुसेंनी स्पष्ट केलं.

कांदा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "नाफेडच्या माध्यमातून ४१ हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात येणार आहे.नाफेडची कांदा खरेदी ही फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत होते, त्यांच्या नियमावलीत काही अडचणी आहेत. आम्ही केंद्राला नियमांमध्ये बदल करण्यासाठी विनंती करु. आमचं देखील म्हणणं आहे की, नाफेड बाजारात आलं पाहिजे. कांदा प्रश्नाबाबत कृषीमंत्री तातडीने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना भेटायला गेले आणि त्यांनी चर्चा केली."

नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन खरीप हंगामात पिकांना मुबलक प्रमाणात पाणी न मिळाल्याने पिकं करपतं आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ६५ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती भुसेंनी दिली.

दादा भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील धरणामध्ये ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध आहे. परतीचा पाऊस आल्यास रबी हंगामाचा प्रश्न सुटेल. पशूधनासाठी लागणारा चारा पुढील चार महिन्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. नाशिक जिल्ह्यातील चारा शक्यतो बाहेर जाणार नाही, यासाठी प्रयत्न करु.

त्यानंतर दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या जनावराच्या संख्येची माहिती दिली. दादा भुसे म्हणाले की, "नऊ तालुक्यामध्ये ५२६ जनावर लंपी आजाराने बाधित आहेत.३० जनावरे मृत्यू पावले असून ५५ जनावरे गंभीर स्थितीत आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT