सेंद्रिय गुळाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंग यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. esakal
नाशिक

भोपाळला नाशिकच्या सेंद्रीय गुळाचा गोडवा

कुणाल संत

नाशिक : काँग्रेसच्या भोपाळ येथील १७ व्या अधिवेशनात नाशिक हनी ‘बी' या शेतकरी कंपनीने तयार केलेल्या सेंद्रिय गुळाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंग यांनी उत्पादनाची माहिती घेत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचे कौतुक केले.

देशातील ५० विज्ञानवादी संघटनांची शिखर संघटना असलेल्या एआयपीएसएन या संस्थेकडून भोपाळ येथे अधिवेशन झाले. यामध्ये शेतकऱ्यांकडून शाश्वत शेतीचे प्रयोग या विषयावर आयोजित चर्चा सत्रात भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेतर्फे शेतकरी गटाचे अध्यक्ष विष्णूपंत गायके यांनी सहभाग घेतला होता.

श्री. गायके यांनी संघटनेच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या शेतकरी कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास उपस्थित शास्त्रज्ञान समोर सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधक दिनेश अब्रोल होते. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या या उपक्रमांची अधिवेशनात चांगलीच चर्चा झाली.

याप्रसंगी प्रदर्शनात सर्व प्रकारचे गूळ पावडर, क्यूब यांचे प्रदर्शन चर्चेचा विषय ठरले. याप्रसंगी डी. गंगाधरन, आशा मिश्रा, सब्यसाची चटर्जी, काशिनाथ चॅटर्जी, विनायक कदम, प्रा. मुजताबा लोखंडवाला, विलास तांबे, डॉ. प्रदीप जायभाये, लक्ष्मण जाधव, नानासाहेब सरोदे, विजया बंदरे, भारत पाटणकर, शेतकरी नेते अशोक ढवळे यांनीही कौतुक केले. भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे राज्य सचिव संतोष शेंडकर यांनी शेतकरी गटाची यशोगाथा सांगितली. याप्रसंगी दिग्विजय सिंग आणि सव्यासाची चटर्जी यांना गूळ भेट म्हणून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: लॉटरीची घरे घटणार? २० टक्के योजनेतील घरांवरून म्हाडा-पालिका पेच

Young Age Lifestyle Diseases: तिशीतच वाढतोय डायबेटीस-BPचा धोका! तरुणांच्या मेटाबॉलिक हेल्थमध्ये नेमकं काय बिघडतंय?

IND vs SL, 2nd Test: श्रीलंकेकडून फाईटबॅक! सोनल दिनूशाची शतकाकडे वाटचाल; भारत फॉलोऑन देणार?

Driving License: RTO मध्ये न जाता घरबसल्या बदला ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता! जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT