Shyamkumar Sable with Dada Bhuse esakal
नाशिक

Nashik Political News : माजी नगरसेवक साबळे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांचे समर्थक व शिवसेनेचे माजी नगरसेवक श्‍यामकुमार साबळे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून हकालपट्टी केलेल्यांची नावे जाहीर करण्यात आली, त्यात साबळे यांचे नाव अग्रस्थानी आहे. (Former corporator shyamkumar Sable expelled from Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Nashik Latest Political News)

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून साबळे यांनी पक्षाच्या बैठका तसेच आंदोलनात सहभागी न होता स्वतःला दूर ठेवले होते. शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यात पालकमंत्री दादा भुसे यांचा मोठा वाटा असल्याने भुसे सांगतील त्याचप्रमाणे त्यांची आतापर्यंतची रणनीती होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादा भुसे यांनी शिंदे यांचा हात धरला. त्यामुळे साबळे हेदेखील भुसे यांच्यामागे जातील असे तर्क होते. त्या दृष्टीने त्यांची पावलेदेखील वळले.

त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) त्यांचे अधिकृत हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना साबळे म्हणाले, की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आपला संबंध नसल्याचे यापूर्वीच माहिती आपण कार्यालयाला दिली होती. मात्र ठाकरे गटाला उशिरा जाग आल्याचे दिसून येते, तर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT