Loksabha Election sakal
नाशिक

Loksabha Election : शरद पवार-सुनील तटकरे यांची भेट;माजी मंत्री अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा असतानाच शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलला अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा असतानाच शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलला अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशमुख दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘शरद पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. तेथे सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले,’’ असा दावा देशमुख यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ४ जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज होतील. कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशात २०० जागा पार सुद्धा महायुती जिंकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जितक्या जास्त सभा होतील तितका महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. मोदींनी जास्त सभा घ्याव्यात जेणेकरून महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल, असा टोला त्यांनी देशमुख यांनी लगावला. मुख्यमंत्री यांच्या बॅग तपासणीवर टीका करताना ते म्हणाले की, आधी आलेल्या बॅगांवर संशय होता म्हणून यावेळी चौकशीचे नाटक केले. मुख्यमंत्र्यांनी केवळ देखावा केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात जोरात सुरू आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनीही भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती.

देशमुखांचा दावा फेटाळला

अनिल देशमुख यांचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेटाळला आहे. मी आणि शरद पवार एकाच हॉटेलला नाशिकमध्ये मुक्कामाला होतो. मात्र, तटकरे यांची भेट झाली नसल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काही वेळापूर्वीच तटकरे नाशिकहून पालघरच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळच्या मुंबईतल्या महायुतीच्या सभेसाठीदेखील ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT