fraud 
नाशिक

दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : झटपट श्रीमंती कोणाला नको असते, पण याचाच फायदा घेत एखादा भामटा तुमचा खिसा रिकामा करु शकतो. गुंतवलेले पैसे ठरावीक वेळेत दुप्पट मिळतील असे अमिष दाखवून वृध्द महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

सन 2011 ते 17 या काळात देविदास अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करुन पगारे यांच्याकडून रियल लाईफ ॲग्रो केटल प्रा. लि., रियल लाईफ क्रियेट्रअर्स इंडिया लि. तसेच एलआयसीआय डेव्हलपर्स लिमिटेड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर व एजंट असल्याचे भासवून विश्‍वास संपादन केला.

नेमके काय घडले?

शहरातील कॅम्प शिवाजीनगर भागातील 62 वर्षीय वृध्देला विविध कंपन्यांच्या नावाने पैसे गुंतवत मुदतीनंतर दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवत खोटे प्रमाणपत्र देवून सुमारे 2 लाख 86 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठकबाजी प्रकरणी कुमूद पगारे (वय 62) यांच्या तक्रारीवरुन देविदास अहिरे यांच्यासह सात संशयितांविरुध्द कॅम्प पोलिस ठाण्यात ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  न्यायालयीन आदेशानंतर छावणी पाेलिसांनी पगारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघे संशयित बाहुबलीनगर धुळे येथील, दोघे संशयित झोडगे येथील तर एक संशयित देवारपाडे येथील आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT