fraud bride news esakal
नाशिक

Crime Update : 2 वरांची साडेपाच लाखाची फसवणूक; दागिण्यांसह नववधूंचे पलायन

प्रमोद सावंत

मालेगाव : आघार बुद्रुक (ता. मालेगाव) येथील दोन वरांकडून लग्नाच्या मोबदल्यात प्रत्येकी अडीच लाख रुपये व फोन पे वरुन दोन वेळेस व रोख तब्बल ६० हजार रुपये असे एकूण पाच लाख ६० हजार रुपये घेऊन विवाहानंतर सात ते आठ दिवस राहिलेल्या नववधुंनी दागिन्यांसह पलायन करुन वरांची व वर बापाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

ग्रामीण भागात शेतकरी मुलांना मुली मिळत नसल्याने त्यांचे विवाह खोळंबले आहेत. आर्थिकदृष्ट्या सधन शेतकरी नियोजित वधूला पैसे देवून लग्नाचा बार उडवित आहेत. त्यातही अनेकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. (Fraud of 2 groom of five half lakhs Brides ran away with Jewelry Crime Update latest marathi news)

काळू भावसिंग निकम (रा. कोलतीमला, आघार बुद्रुक) यांचा मुलगा दिनेश निकम व भाचा नरेंद्र पवार यांचे दोन मुलींशी लग्न लावून देण्यासाठी अशोक धनगर, नंदकुमार बोरसे (रा. त्रिमुर्ती चौक नाशिक) यांनी विश्‍वास संपादन केला. संशयितांनी दोघा मुलांचे लग्न लावून देतो असे सांगून फोन पे वर तीन टप्प्यात ३० हजार, १० हजार व २० हजार रुपये रोख असे तब्बल ६० हजार रुपये घेतले. नववधू असलेल्या प्रियंका व तेजस्विनी यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये द्यावयाचे आहेत.

त्याबदल्यात लग्न लावून देतो असे सांगितले. काळू निकम यांनी रोख रक्कम दिली. विवाहानंतर प्रियंका व तेजस्विनी या नववधू दिनेश व नरेंद्र समवेत सात ते आठ दिवस राहिल्या. यानंतर नंदकुमार हा मुलींना भेटण्यासाठी घेऊन जातो असे सांगून नववधूंना घेवून फरार झाला.

दोघी नववधू परत नांदण्यासाठी आघार येथे परत न आल्याने फसवणूक झाल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. ११ मे २०२२ ते लग्न झाल्यानंतर सात ते आठ दिवसात फसवणुकीचा हा प्रकार घडला.

श्री. निकम यांच्या तक्रारीवरुन वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात श्री. धनगर, श्री. बोरसे, प्रियंका, तेजस्विनी यांच्यासह सात जणांविरुध्द ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस व निकम कुटुंबियांनी त्रिमुर्ती चौकात जाऊन चौकशी केली असता धनगर व बोरसे तेथील खोली साेडून पसार झाल्याचे लक्षात आले. त्यावरुन मुलींची नावे बोगस असावीत. दोघा संशयितांचा मुळ ठाव ठिकाणाही माहीत नसल्याने पोलिसांसमोर या ठकबाजांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT