Money Fraud esakal
नाशिक

Nashik Crime: 'कुसुम’च्या बनावट संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक; आकर्षक अनुदानाचे दाखविले जाते आमिष

योजनेतून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषीपंप खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे, पण...

भारत देवरे

वाखारी : पंतप्रधान कुसुम योजनेचे बनावट संकेतस्थळ आणि ॲपमधून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटनेमध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. योजनेतून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषीपंप खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. (Fraud of farmers through PM Kusum yojana fake website lure of attractive grant shown Nashik Crime)

योजनेतून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील तीन, पाच आणि साडेसात अश्‍वशक्तीच्या कृषी पंपांना अनुदान सरकारतर्फे दिले जाते. योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असताना सोशल मीडियातून होणाऱ्या फसवणुकीचे ग्रहण लागले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बनावट संकेतस्थळ आणि ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे एसएमएस आले आहेत. योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना ‘मेसेज’ पाठविले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘मेसेज’मध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा भरण्यासाठी लिंक दिली जाते.

लिंकवर क्लिक केल्यावर बनावट संकेतस्थळ उघडले जाते. अधिकृत संकेतस्थळाप्रमाणे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे आग्रह धरला जातो.

सर्वसाधारणसाठी शेतकऱ्यांना ९० आणि अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानाचे आमिष दाखविण्यात येत आहे. वाखारी येथील नंदू चव्हाण यांनी योजनेतून पंप बसविण्यात काम केले होते.

कामाच्या अनुभवावर निमगाव, जाटपाडे, साकुरी, जातेगाव, बाणगाव आदी गावातील शेतकऱ्यांना त्यांनी पैसे भरण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले नाही.

पंतप्रधानांच्या छायाचित्राचा गैरवापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर छायाचित्र वापरण्यात आले आहे. त्यामुळे बनावट संकेतस्थळ खरे वाटावे म्हणून पंतप्रधानांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, बनावट संकेतस्थळाच्या लिंकला क्लिक करून पैसे भरल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाल्याचा बँकेच्या नावाने बनावट ‘मेसेज’ शेतकऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी बँकेत चौकशी केल्यावर खात्यात पैसे जमा नसल्याची बाब शेतकऱ्यांच्या ध्यानात आली.

"शेतकऱ्यांनी बनावट संकेतस्थळ, ॲप आणि ‘मेसेज’बद्दल सतर्क राहिले पाहिजे. खोट्या व फसव्या संकेतस्थळासह मोबाईल ॲपला भेट देऊ नये. तसेच फसव्या दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरील संभाषणाला, आवाहनाला बळी पडू नये. बनावट संकेतस्थळावर पैसे पाठवू नयेत."- हेमंत कुलकर्णी, विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा (नाशिक)

"अधिकृत संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या यादी प्रसिद्ध होत असते. या अधिकृत संकेतस्थळावर माहिती असलेल्या व्यक्तींच्या मदतीने शेतकऱ्यांनी पैसे भरावेत. आपल्या नावाची खात्री अधिकृत ठिकाणी करणे आवश्यक आहे." - नारायण घोटेकर, कृषीपंप वितरक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT