Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: पॅनकार्ड अपडेटच्या नावाखाली सव्वाचार लाखांची फसवणूक; संशयिताने पर्सनल लोन घेत घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी एकाला सव्वा चार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

संशयिताने क्रेडिट कार्डवर पर्सनल लोन मंजूर करून ही रक्कम परस्पर लांबविली असून याप्रकरणी सायबर पोलिसात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of Rs 4 lakh in guise of PAN Card Update suspect cheated by taking personal loan nashik cyber crime)

मुकेश रमेशचंद्र सोनवणे (रा. गोविंदनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ५ तारखेला भामट्यांनी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला होता. ९९५३८७५८८० या मोबाईलधारकाने दिलीप रंजन नाव असल्याचे सांगून आपण अ‍ॅक्सीस बॅकेतून बोलत असल्याचे सांगितले.

संबंधीत भामट्याने अ‍ॅक्सीस बँकेतील बचत खात्याला जोडलेले पॅनकार्ड अपडेट नसल्याचे सांगितले. सोनवणे यांचे अ‍ॅक्सीस बँकेत बचत खाते असल्याने त्यांनी काय करावे लागेल, अशी विचारणा केली असता संबंधीताने तात्काळ अपडेटसाठी मोबाईलमध्ये अ‍ॅक्सीस डॉट एपीके अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोनवणे यांनी अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करताच भामट्याने सोनवणे यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवत त्यावर ४ लाख १८ हजार रूपयांचे तात्काळ पर्सनल लोन मंजूर करून घेतले.

त्यातील ४ लाख १५ हजार ९८५ रूपयांची रक्कम सोनवणे यांच्या बचत खात्याच्या माध्यमातून अन्य खात्यांवर परस्पर वर्ग करून ही आर्थिक फसवणुक केली.

याबाबतचा संदेश प्राप्त होताच सोनवणे यांनी बॅकेत जावून पडताळणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT