Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Crime: Crypto Currencyचे आमिष दाखवून एकाला सव्वातीन लाखांना गंडा; भामट्याविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Crime : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील एकाला सव्वा तीन लाखास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fraud three half lakhs by showing lure of Crypto Currency case registered Nashik Cyber ​​Crime)

विष्णूकुमार सुरेंद्रकुमार बेटकरी (रा. रजत पार्क वनश्री कॉलनी, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, बेटकरी यांच्याशी जानेवारी महिन्यात इन्स्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यमातून अज्ञात भामट्यांनी संपर्क साधला होता.

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास भरघोस मोबदला मिळेल असे आश्वासन देत अ‍ॅक्सीस, आयसीआयसीआय, आयडीएफसी व येस बॅंकेच्या विविध खात्यात बेटकरी यांना पैसे टाकण्यास भाग पाडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एका महिन्यात बेटकरी यांनी ३ लाख २५ हजाराची गुंतवणुक केली. मात्र भामट्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मोबदला मिळाला नाही.

त्यामुळे बेटकरी यांनी संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT