Fake Documents esakal
नाशिक

जामीन प्रकरणात खोटी नावे वापरून फसवणूक; गुन्हा दाखल

कुणाल संत

नाशिक : जिल्हा न्यायालयातील विविध न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या ८१ जामीन (Bail) प्रकरणांमध्ये संशयित १७ जणांनी बनावट दस्तऐवज, कागदपत्रे बनवून विविध नावांचा वापर करत आरोपींना जामीनदार राहून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मार्च ते ऑक्टोबर २०२१ यादरम्यान जिल्हा न्यायालयातील विविध न्यायदान कक्षांमध्ये दाखल असलेल्या जामीन प्रकरणांमध्ये संशयितांनी आरोपींना खोटी व बनावट कागदपत्रे बनवून वेगवेगळी नावे वापरून जामीन मिळवून देत शासनाची फसवणूक केली असल्याचे प्रकार समोर आला. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी या संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच या सर्व संशयितांना बनावट दस्तऐवज (Fake documents) तयार करून देणाऱ्या कल्पना पाटील, इम्रान पिंजारी, जावेद पिंजारी यांच्याविरुद्धही मुख्य दंडाधिकारी व न्यायालयाची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

हे आहेत संशयित

रीना ऊर्फ नीता नवले (रविवार पेठ), मंगल संजय वाघ (गंगापूर गाव), युवराज निकम (खामखेडा, ता. देवळा), मधुकर जाधव (पिंपळगाव बहुला), लक्ष्मण खडताळे (गोवर्धन), राधिका ऊर्फ रझिया शकील खाटी (पाथर्डी गाव), इक्बाल पिंजारी (वडाळागाव), पंरा (जातेगाव), राजू वाघमारे (त्र्यंबकेश्‍वर), रवी मोतीराम पाटील (मातोरी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT