Launching free electric fast charging stations for two-wheelers in Vijayanagar area of ​​the city esakal
नाशिक

Nashik : सिन्नरमध्ये दुचाकींसाठी मोफत चार्जिंग स्टेशन; पन्हाळे कुटुंबियांची सामाजिक बांधिलकीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

Nashik : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पन्हाळे कुटुंबियांनी पुढाकार घेत, पदरमोड करून सामाजिक बांधिलकी राखत शहरातील विजयनगर परिसरात टू-व्हिलर वाहनांसाठी मोफत इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन सुरु केले आहे.

तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असा हा पहिलाचा प्रयोग असून पन्हाळे कुटूंबियांचे परिसरातून कौतुक होत आहे. (Free charging stations for bikes in Sinnar Appreciation of social commitment of Panhale family Nashik news)

ओम सुनील पन्हाळे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी हे स्टेशन सुरु करण्यात आले आहे. मोफत चार्जिंग होणार असल्याने अडलेल्या वाहनधारकांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे.

सध्या प्रत्येक ठिकाणी प्रदूषण वाढत चालले आहे. प्रत्येकाची घाई असतेच, दुचाकी वाहनांना इंधन वेळेत मिळत नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. याशिवाय पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपावर तास न तास ताटकळत थांबावे लागते.

निसर्गाचा समतोल साधणे तसेच इलेक्ट्रिक वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पन्हाळे यांनी नाशिकचे डेप्युटी इंजिनिअर योगेश काळे व सिन्नरचे सहाय्यक अभियंता सुनील उगले यांच्या सहकार्यातून आपल्या घराजवळ दुचाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन मोफत सुरु केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नुकतेच या स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. सुनील पन्हाळे, राजेंद्र चौधरी, विशाल पन्हाळे, अनिकेत पन्हाळे, जय पन्हाळे, श्रेयस पन्हाळे, सात्विक व्यवहारे, प्रतीक पन्हाळे उपस्थित होते. ओम पन्हाळे यांनी चार्जंग स्टेशनबद्दल माहिती दिली.

चार्जिंगची सेवा २४ तास उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनधारकांनी आपली वाहने या चार्जिंग स्टेशनवर घेऊन येऊन चार्ज करावी, असे आवाहन पन्हाळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT