नाशिक

१७८ रुग्णांची मोफत तपासणी

CD
NSK26H33695 जळगाव : रोटरी मिडटाऊनच्या शिबिराच्‍या उद्घाटनप्रसंगी डॉ. आर. के. शिंपी, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, किरण सिंग, डॉ. किरण सुपे आदी. – रोटरी मिडटाऊनच्या शिबिरात १७८ रुग्णांची मोफत तपासणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन, एस. के. चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि श्री हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या विद्यमाने आयोजित शिबिरात १७८ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण करण्यात आले. गिरणा टाकीजवळील श्री हॉस्पिटल येथे ज्येष्ठ पुरुष व स्त्री यांच्यासाठी मूत्ररोग व त्यासंबंधी व्याधींसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पुणे येथील मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. आर. के. शिंपी यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. रुग्णांना औषधांचे देखील मोफत वितरण करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी डॉ. आर. के. शिंपी, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्ष किरण सिंग, मानद सचिव डॉ. किरण सुपे, प्रोजेक्ट चेअरमन किशोर सूर्यवंशी, दिलीप गांधी यांची उपस्थिती होती. रुग्ण तपासणीत डॉ. धनराज चौधरी, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. अक्षय जगताप, डॉ. लुंमबीनी, डॉ. संचाली यांचे सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी डॉ. सुमन लोढा, अनिल अग्रवाल, शंकरलाल पटेल, शेखर प्रभूदेसाई, डॉ. उषा शर्मा, मनोज पाटील, डॉ. विवेक वडजीकर, ॲड. महेंद्र चौधरी, श्रीरंग पाटील, डी.ओ.चौधरी, संजय बारी, डॉ. प्रकाश चित्ते, सुनंदा देशमुख, कॅप्टन मोहन कुलकर्णी यांच्यासह रोटरी मिडटाऊनचे सर्व सदस्य व श्री हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC election results: चार राज्यांतील 28 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला एकही नाही; सत्ता असूनही कर्नाटकात काँग्रेसची धूळधाण

Pune News : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार, टीकेला कामातून उत्तर देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT