संक्षिप्तला
धुळे ः टुडे २ साठी....
---
पालकमंत्र्यांचा पुढाकार;
गरजूवर मोफत शस्त्रक्रिया
धुळे ः दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील नरेंद्र नेरकर यांच्यावर मंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून आणि वैद्यकीय कक्षाच्या पाठपुराव्यामुळे मोफत ‘हिप रिप्लेसमेंट’ (खुबा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. खासगी रुग्णालयात या उपचारांसाठी पाच ते सात लाख रुपये खर्च अपेक्षित होता; मात्र सरकारी आरोग्य योजनेचा लाभ मिळवून दिल्याने नेरकर कुटुंबावरील मोठा आर्थिक भार हलका झाला आहे. नेरकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची गरज होती. या उपचारांचा खर्च मोठा असल्याने नेरकर कुटुंब चिंतेत होते. ते राजशिष्टाचार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रावल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय कक्षाला आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना दिली. मंत्री रावल यांच्या वैद्यकीय कक्षाने ठाणे येथील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाशी संपर्क साधून योग्य समन्वय साधला. शासकीय आरोग्य योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केल्याने नेरकर यांच्या एका खुब्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर लवकरच त्यांच्या दुसऱ्या खुब्याचीही शस्त्रक्रिया याच योजनेंतर्गत मोफत केली जाणार आहे.
---
आर्थिक अडचणींमुळे कोणताही गरजू रुग्ण महागड्या आणि वेळेवर मिळणाऱ्या आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, हा मंत्री रावल यांच्या वैद्यकीय कक्षाचा मुख्य उद्देश आहे. या संवेदनशील पुढाकारामुळे नेरकर कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.