असंघटित कामगारांसाठी
मोफत विविध कार्ड नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : धरणगावातील फुलपाट, आव्हाणी, दोनगाव व एकलग्न येथे दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड व कामगार शिक्षण विभाग, नाशिक यांच्या वतीने असंघटित कामगारांसाठी मोफत ई-श्रम, आभा व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात सुमारे ३५० असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली.
शिबिराच्या माध्यमातून विविध समुदायांतील व वयोगटांतील नागरिकांना ई-श्रम, आभा, मतदार ओळखपत्र तसेच आयुष्मान भारत कार्डसाठी मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. असंघटित कामगारांसाठी असलेल्या विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. फुलपाट येथे सरपंच मंगलाबाई दत्तू पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कामगार शिक्षण अधिकारी, नाशिक विभागाच्या सारिका डफरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ई-श्रम, आभा व आयुष्मान भारत कार्डासह सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. श्रमिक मित्र नितीन नेरकर यांनी नागरिकांना नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगत योजनांच्या लाभाची माहिती दिली. जनसहयोग फाउंडेशन यांचेही शिबिरासाठी सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.