नाशिक

मुक्तीभूमीवर बहरली मुक्तीगीतांची मुक्ती पहाट येवला

CD
फोटो २ कॉ YEO26B27205 येवला : तालुका मुक्ती महोत्सव समितीतर्फे मुक्तीभूमीवर आयोजित मुक्ती पहाट व रक्तदान शिबिरात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्ते. ------------ मुक्तीगितांतून बहरली मुक्तीची पहाट येवला : रक्तदान शिबिर, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१७ : धर्मांतर घोषणेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या कलापथकातर्फे सामाजिक प्रबोधन गीतांचा कार्यक्रम मुक्ती पहाट येथे उत्साहात झाला. - ह्याच भूमीवर भीम गर्जला, झाले मोकळे गुलाम, आली मुक्ती पहाट झाली मुक्ती पहाट।। या मुक्त भूमीच्या वर्णनासह "दान दे रे नरा दान दे प्राण भारत भुला दान दे" जळू द्या तो धर्म इथे साराच, सारा सारा। जात पाळणारा हा घात पाळणारा।। यासह लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सुप्रसिद्ध गितांचे सादरीकरण कलापथकाचे कवी गायक सुनील खरे, शरद शेजवळ व कलापथकाने सादर केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुणाल कांबळे, डॉ. बबन जोगदंड, समता सैनिक दल कार्यकर्ते, मुक्तीभूमी वाचनालय वाचक पदाधिकारी उपस्थित होते. मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी, मुक्ती प्रतिष्ठानतर्फे व कोपरगावच्या लायन्स समता ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिर झाले. मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमीचे प्रवर्तक प्रा. शरद शेजवळ, संयोजक सुरेश खळे, शैलेंद्र वाघ, विनोद सोनवणे, बी. डी. खैरनार, विशाल गरुड, गजानन सूर्येकर, आरती खरात, सुभाष वाघेरे, पायल गायकवाड, सिद्धार्थ गरुड यांनी परिश्रम घेतले. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

SCROLL FOR NEXT