Preparations for the 'Homethon' exhibition at the Dongri hostel ground. esakal
नाशिक

NAREDCO Homethon 2022 : आजपासून ‘होमथॉन २०२२’ नाशिककरांसाठी खुले!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अनेक महिन्यांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या ‘होमथॉन २०२२’ प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शन गुरुवार (ता. २२) पासून नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहे. बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या नरेडको संघटनेतर्फे २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत प्रॉपर्टी प्रदर्शन नाशिककरांना पाहायला मिळेल. (From today Naredco Homethon 2022 open for Nashikkar nashik news)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

गंगापूर रोडवरील डोंगरी वसतिगृह मैदान येथे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्‌घाटन नरेडकोचे उपाध्यक्ष व बांधकाम क्षेत्रातील डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार आहे. नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदलकर या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व समन्वय जयेश ठक्कर यांनी दिली. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड या वेळी उपस्थित राहणार आहे.

प्रदर्शनामध्ये पंधरा लाख रुपयांपासून ते चार कोटी रुपयांपर्यंतची घरे नाशिककरांना पाहायला मिळतील. लीव्ह- इन्व्हेस्ट-गो ’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आहे. जागेवर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट दिले जाणार आहे. त्याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दर तासाला लकी ड्रॉ च्या माध्यमातून चांदीचे नाणे भेट दिले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये केंद्र सरकारचा रिअल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठी उभारलेल्या स्वामी फंडाचे सहकार्य मिळणार आहे. प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, भाविक ठक्कर, आश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : ISRO कडून भारतीय संवाद उपग्रह CMS-03 चे यशस्वी प्रक्षेपण

SCROLL FOR NEXT