theater  esakal
नाशिक

नाट्यगृह अजूनही लॉकच; रंगकर्मींमध्ये नैराश्‍याचे वातावरण

तुषार महाले

नाशिक : कोरोना निर्बंध राज्य सरकारने शिथिल केले असून, चित्रीकरणालाही परवानगी दिली आहे, मात्र नाट्यगृह व चित्रपटांना अजूनही बंद ठेवले आहे. सरकारने एकीकडे निर्बंध शिथिल करत असताना व्यवसायासाठी आठ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. दुसरीकडे नाट्यगृह बंदच ठेवायचे हा कुठला न्याय, असा सवाल करून रंगकर्मींकडून नाराजी व्यक्त होत आहे. रंगभूमीला दुय्यम दर्जाचे मानले जात असल्याची भावना नाट्यकर्मींनी व्यक्त केली आहे.

सोशल माध्यमावर गेल्या महिनाभरापासून रंगकर्मी रंगभूमी सुरू करा, ‘थिएटर vs कोविड’ अशा मोहीम राबवीत असताना दुसरीकडे रंगकर्मींकडून नाशिकमध्ये निवेदनही दिले जात आहे. दोन दिवसाआधी निर्बंध शिथिल झाले तेव्हा नाट्यगृह व चित्रपटगृह पन्नास टक्के क्षमेतेने सुरू होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. परंतु, नाट्यगृह सुरू न झाल्यामुळे रंगकर्मींमध्ये नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले असून, प्रेक्षकही आसुसलेले आहे. निर्माता- अभिनेता प्रशांत दामले, निर्माता- दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही नाट्यगृह सुरू करण्यासंदर्भात मोहिमेत भाग घेतला आहे. राजकीय लोकांची जोरदार ‘नाटकं’ सुरू असताना, झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो, पण रंगभूमीवर आमच्या नाटकांना मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई, असे ट्विट केदार शिंदे यांनी गेल्या महिन्यात केले होते. प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्ट लिहीत रंगकर्मींबद्दल व्यथा व्यक्त केली आहे.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नाट्यगृहांना सरकार परवानगी देत नाही. करमणुकीची भूक भागविणे काळाची गरज असून, सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार करावा. इतर व्यवसायांना लावलेले नियम नाट्यगृहांना लागू करावे, कोरोना वाढवण्याची आमची इच्छा नसून सप्टेंबरपर्यंत नाट्यगृह सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा.

-रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्यपरिषद, नाशिक शाखा

नाट्यगृह सुरू करण्यासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. जसे इतर व्यवसायांना रात्री आठपर्यंत नियम लावले आहेत. तसेच नाट्यगृहांना परवानगी मिळाल्यास प्रेक्षक संख्या रूळावर येण्यासाठी वेळ लागेल. शुटिंगला परवानगी दिली असून, रंगकर्मी, रसिकांवर अन्याय का, असा प्रश्न पडत आहे. परवानगी न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.

-सचिन शिंदे, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT