Narendra Darade & Kishore Darade esakal
नाशिक

Nashik News: येवल्यातील रस्त्यांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर! आमदार दराडे बंधूंचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

येवला : तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांनी सुमारे ४० कोटींच्या निधीला मंजुरी मिळविली आहे.

यामुळे ग्रामीण भागातील वर्षानुवर्ष रखडलेल्या रस्त्यांची अवकळा थांबून नागरिकांची सोय होणार आहे. (Fund of 40 crores approved for roads in Yeola Initiative of MLA Darade brothers Nashik News)

मागील वर्षात येवला शहर व नववसाहतीत तब्बल ६५ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह डांबरीकरणाच्या विविध कामांना आमदार दराडे बंधूंनी चालना दिली आहे. कित्येक वर्षापासून न झालेली रस्ता कामे आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून पूर्णत्वास गेली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार, पालकमंत्री दादा भुसे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर विभागाच्या मंत्र्यांच्या सहकार्याने येवला- लासलगाव परिसरातील विकासासाठी भरीव निधी मिळविण्यात त्यांना यश आले आहे.

पुरवणी अर्थसंकल्पात पाठपुरावा करून पढेगाव-न्याहारखेडे-रेंडाळे ते ममदापूर रस्ता, मनमाड ते भालूर-राजापूरमार्गे रहाडी, भारम, अंकाई-नायगव्हाण, राजापूर-खरवंडी-ते रहाडी, नांदेसर-उंदीरवाडी बोकटे ते खामगाव, तिसगाव बहादुरी-पाटोदा ते पिलखोड हद्द, नायगव्हाण-कुसमाडी-धामोडे ते बाभूळगाव,

खामगाव-आडसुरेगाव ते भुलेगाव, सावरगाव- भाडगाव-चिचोंडी-निमगाव मढ ते रवंदा, धुळगाव, सातारे-जऊळके- शिरसगाव लौकीमार्गे लासलगाव, वापी ते निफाड-येवला या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT