Family members visiting the body of hero Hemant Devre in Nagremala on Tuesday. esakal
नाशिक

Nashik News : जवान हेमंत देवरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

भारतीय सैन्यात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे वीरमरण आलेले जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांचे पार्थिव मंगळवारी (ता.६) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमाराला इंदिरानगरच्या नागरे मळा येथील वरदसाई या त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर कुटुंबीयांचा शोक अनावर झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भारतीय सैन्यात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे हृदयविकाराने निधन झालेले जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांचे पार्थिव मंगळवारी (ता.६) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमाराला इंदिरानगरच्या नागरे मळा येथील वरदसाई या त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर कुटुंबीयांचा शोक अनावर झाला.

यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांचे डोळेही पाणावले होते. (Funeral of soldier Hemant Deore today nashik news)

बुधवारी (ता.७) सकाळी १० वाजता पंचवटी अमरधाममध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

पोलिस दलात कार्यरत पत्नी वंदना, माजी सैनिक असलेले वडील यशवंत देवरे, आई शीला, बहिणी नीलम आणि रूपाली यांच्यासह सर्वच नातेवाईक आणि मित्र परिवाराला दु:ख आवरने मुश्कील झाले होते.

तर दुसरीकडे अवघ्या चार वर्षाचा त्यांचा मुलगा वरद आणि सात वर्षांची मुलगी लावण्या यांना मात्र फक्त आपल्या बाबांना काहीतरी झाले आहे, एवढेच कळत होते. त्यांची कावरी-बावरी नजर मात्र उपस्थितांना नि:शब्द करत होती.

पोलिस दलातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बुधवारी सकाळी ८ वाजता घराजवळ पारंपारिक आर्मी परेडद्वारे मानवंदना देऊन अंत्ययात्रेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती सुभेदार मनोज जुन्नरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Astrology : विधानसभा बरखास्त होण्याचा अंदाज ते अन्य राज्यातील सरकारं अस्थिर होण्याची शक्यता...काय सांगतं या आठवड्याचं राजकीय भविष्य?

Latest Marathi News Updates : कालव्याचं काम ४५ वर्षांपासून सुरू, ग्रामस्थांकडून आमरण उपोषण

Mumbai Indians, RCB च्या खेळाडूंसह १३ भारतीयांची वेगळी वाट! परदेशातील लीगच्या ऑक्शनसाठी नोंदवली नावं

ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रिया जेलरच्या डोळ्यात धूळ फेकून तुरुंगाबाहेर, अश्विन पुन्हा तिच्या जाळ्यात अडकणार

Ganesh Chaturthi 2025 Puja: गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची आजच करा यादी, आयत्यावेळी होणार नाही गडबड

SCROLL FOR NEXT