Adivasi Katkari community members leading the funeral procession on Wednesday under police security.
Adivasi Katkari community members leading the funeral procession on Wednesday under police security.  esakal
नाशिक

Nashik News : इथे मरणही झाले अवघड...! आदिवासी नागरिकांची करुण कहाणी...

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुनवणेवाडी (ता. इगतपुरी) येथे रस्ता नाही म्हणून मंगळवारी (ता. २५) गरोदर मातेला बाळासह आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता.२६) टाके-घोटी येथेही मरण अवघड झाल्याची घटना घडली.

तहसीलदार व पोलिस प्रशासनाने वाट मोकळी करून दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. (funeral was stop for whole day due to blocking of footpath nashik news)

येथील आदिवासी कातकरी पाड्यावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक शेतातील पायवाटेने ये-जा करतात. कातकरी पाड्यावरील वस्तीत आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असताना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका, असे सांगत मज्जाव केला. संबंधित अंत्यविधी दिवसभर अडून पडला होता.

याबाबत तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलिस यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस बंदोबस्तात पायवाट मोकळी करून दिल्याने मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकीकडे रस्ता नाही म्हणून रुग्णाला जीव गमवावा लागतो, तर दुसरीकडे मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते, ही दुर्दैवी बाब आहे.

आदिवासी कातकरी समाजासाठी आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आहेत. मात्र कातकरी वस्त्यांमध्ये त्या योजना पोचल्या नाहीत म्हणूनच अनेक गावांत आदिवासींची दशा अजूनच बिघडत आहे, असे एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT