malegaon meeting.jpg
malegaon meeting.jpg 
नाशिक

मालेगावला पहिलीवहिली ऑनलाइन महासभा ठरली वादग्रस्त...हे आहे कारण..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) महापालिकेची पहिलीवहिली ऑनलाइन महासभा गुरुवारी (ता. १६) अनेक अर्थाने गाजली. ४० मिनिटांत १२ प्रस्ताव मंजूर झाले. नेटवर्कअभावी अनेकांना बोलण्याची संधी मिळाली नाही. सत्तारुढ गटाचे सभागृहनेते वगळता विरोधी सदस्यांचे सर्वांचा आवाज म्युट करून ठेवण्यात आला. त्यामुळे पहिलीवहिली सभा वादग्रस्त ठरली. 

सभा बेकायदेशीर ठरविण्याची मागणी

महापालिकेची पहिली ऑनलाइन महासभा दुपारी चारला महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. झूम ॲपवर झालेल्या महासभेत सदस्यांचे म्हणणे सभागृहात ऐकू येत नव्हते. प्रस्ताव वाचनानंतर सभागृहनेते अस्लम अन्सारी यांच्या सूचनेनुसार सर्व १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विकास आराखड्यातील व्यापारी संकुल, उद्यान, खेळाचे मैदान यासाठी आरक्षित भूखंड, बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर राबविण्याच्या प्रस्तावाची श्री. कापडणीस यांनी माहिती दिली. पहिल्या दोन विषयांची चर्चा सुरू असतानाच १२ प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले गेल्याने विरोधकांनी ही सभा बेकायदेशीर ठरविण्याची मागणी केली. 

माजीद युनूस सभागृहात 

सभेतील कामकाज सदस्यांना समजत नव्हते, बीओटीवर कोणत्या जागा विकसित करणार हेच कळत नसल्याने ‘एमआयएम’चे माजीद युनूस यांनी थेट सभागृह गाठत महापौरांनी लोकशाहीचा खून केला, असा आरोप करीत कोणाला काही समजलेदेखील नाही, असे असताना विषय मंजूर कसे झाले, असे विचारले. याचवेळी महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना केल्याने माजीद यांनी स्थायी सभापती खालीद परवेज यांच्याकडे इतिवृत्ताची मागणी केली. 

महासभेतील मंजूर विषय 

शहरातील आठ जागा बीओटी तत्त्वावर विकसित करणे, प्लॅस्टिक रिसायकलिंग, पॉवरलूम, सायजिंगच्या अडचणी दूर करणे, औद्योगिक व वाणिज्य व्यवसायांसाठी विविध उपाययोजना करणे, अग्निशामक नोकर भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिलतेचा शासनाला प्रस्ताव देणे, भायखळा झोपडपट्टीतील जुने शौचालय तोडणे, प्रभाग क्रमांक १० मधील विविध विकासकामांना मंजुरी, 'म्हाडा'ने बाजारासाठी आरक्षित केलेली जागा खरेदी करणे, कामांसाठी संगणक अज्ञावली तयार करणे, छत्रपती शिवाजी प्रवेशद्वाराच्या कामाला मंजुरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT