नाशिक

वहन मिरवणूकीने ग्रामनगरीत चैतन्‍य

CD
वहन मिरवणुकीने ग्रामनगरीत चैतन्‍य (उपशीर्षक) गजेंद्र मोक्ष वहन दर्शनासाठी गर्दी; अभंग, भारुडाने भक्तीचे स्वरुप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : श्रीराम वहनोत्सवात आज (ता.१८) श्री गजेंद्र मोक्ष वहन उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आले. वहनाच्या दर्शनासाठी महिला, बाल गोपालांसह वृद्धांसह तरुण वर्गाची मोठी गर्दी झाली होती. तर पानसुपारीच्या ठिकाणी अभंग व भारुड कार्यक्रमाने वहनाला भक्तीचे स्वरूप आले होते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रथ उत्सवामध्ये गुरूवारी श्री गजेंद्र मोक्ष वहनाची मिरवणूक काढण्यात आली. वहनाची पूजा हभप श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते सायंकाळी सातला करण्यात आली. गजेंद्र मोक्ष वहनाच्‍या दर्शनासाठी भाविकांनी रस्‍त्‍यावर गर्दी केली होती. वहन मार्गावर फुले व रांगोळी टाकून स्‍वागत करण्यात आले. वहन श्रीराम मंदिर, भोईटे गढी, चौधरी वाडा, आण्णा भाऊ साठे चौक मार्गाने जाऊन अयोध्‍यानगरातील विनयकुमार बाहेती यांच्या घरी पानसुपारीचा कार्यक्रम झाला. येथे भजन, भारुडाच्‍या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली होती. भाविकांचे पाय भजन व भारुडावर थिरकत होते. पानसुपारीचा कार्यक्रम कार्यक्रम होऊन त्‍याच मार्गाने वहन श्रीराम मंदिरात वहन रात्री आले. चौकट आज गरुड राजचे वहन श्रीराम रथोत्‍सवात सुरू असलेल्‍या वहनोत्‍सवात दहावे वहन उद्या (ता.१९) श्री गरुड राज यांचे काढण्यात येणार आहे. सायंकाळी सातला वहनाची पूजा व आरती होऊन वहन मिरवणुकीला सुरवात होईल. यानंतर वहनाला विठ्ठल पेठ व शनिपेठ येथे पानसुपारी होईल. –

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : शायना एनसीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबई प्रेस क्लब बाहेर निदर्शनं

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

SCROLL FOR NEXT