gambling 1111.jpg
gambling 1111.jpg 
नाशिक

संतापजनक प्रकार! चक्क आईनेच केली मुलाविरूध्द तक्रार..असे काय घडले?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दारू आणि जुगाराच्या व्यसनात अडकलेल्या मुलाने अखेर आपल्याच घरातील रोकड व दागिन्यांवर डल्ला मारला. चोरून नेलेले दागदागिने त्याच्याच आईचे होते. या प्रकरणी आईच्या फिर्यादीनुसार संशयित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आईचाच मुलाविरोधात गुन्हा..

प्रशांत मुकुंद भोसले (रा. कोहिनूर कॉलनी, राजीवनगर) असे संशयित मुलाचे नाव आहे. डॉ. स्वाती भोसले (वय 62, रा. नवजित सोसायटी, कोहिनूर कॉलनी, राजीवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, प्रशांत हा त्यांचा मुलगा असून, त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन आहे. आतापर्यंत त्याने जुगारामध्ये बरेच काही गमावले आहे. 13 जानेवारीला मध्यरात्री संशयित प्रशांतने घरातील रोकड व दागिने चोरून पोबारा केला. यात 28 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र, 16 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र, 19 हजार 500 रुपयांची सोन्याची चेन, 18 हजारांचे सोन्याचे नेकलेस, चार हजार 500 रुपयांचे सोन्याचे टॉप्स, नऊ हजारांची रोकड असा ऐवज संशयित प्रशांतने चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुसरीकडे सोन्याची पोत हिसकावली 
अशोका मार्गावर पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयिताने ओढून पोबारा केला. स्मिता कुलथे (रा. आदित्यनगर, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. 21) रात्री साडेनऊच्या सुमारास स्मिता कुलथे व त्यांचे पती अशोक मार्गाने पायी जात होते. अमूल आइस्क्रीमच्या दुकानासमोर असताना, त्यांच्या समोरून काळ्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची 45 हजारांची सोन्याची पोत ओढून विजय-ममता सिग्नलच्या दिशेने पोबारा केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT