ज्‍योती, गगन सिंग esakal
नाशिक

नाशिकच्‍या धावपटूंनी केली पदकांची कमाई

अरुण मलानी

नाशिक : नडीयाद (गुजरात) येथे सुरू असलेल्‍या वीसाव्‍या राष्ट्रीय फेडरेशन कप कनिष्ठ गट २० वर्षांआतील अजिंक्‍यपद स्‍पर्धेत नाशिकच्‍या एकलव्‍य ॲथलेटिक्‍स ॲन्ड स्‍पोर्ट्‌स इन्‍स्‍टिट्यूटच्‍या धावपटूंनी पदक पटकावले. पाच हजार मीटर गटातून हरियाणाकडून धावताना गगन सिंग याने सुवर्ण, तर ज्‍योतीने कास्‍यपदक पटकावले.

या राष्ट्रीय स्‍पर्धेत एकलव्‍य ॲथलेटिक्‍स ॲन्ड स्‍पोर्टस इन्‍स्‍टिट्यूटच्‍या गगन सिंगने हरियाणाकडून खेळताना, पाच हजार मीटर पुरुष गटातून १४ मिनिटे ४४.९२ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. या गटातून कर्नाटककडून धावताना शिवाजी याने १४ मिनिटे ४७.३८ सेकंदाची वेळ नोंदवून द्वितीय क्रमांकासह रौप्‍यपदक पटकावले, तर दिल्‍लीच्‍या पवन कुमार याने १४ मिनिटे ४८.८९ सेकंद वेळ नोंदवून तृतीय क्रमांकासह कास्‍यपदक पटकावले.

महिलांमध्ये पाच हजार मीटर गटातून ज्‍योती हिने हरियाणाकडून खेळताना १७ मिनिटे ३९.१३ सेकंद वेळ नोंदवून तृतीय क्रमांकासह कास्‍यपदक पटकावले. या गटातून गुजरातच्‍या दृष्टीबेन चौधरी हिने १६ मिनिटे ५३.३३ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. झारखंडच्‍या सुप्रिती कशप हिने १६ मिनिटे ५७.०१ सेकंद वेळ नोंदवून रौप्‍यपदक पटकावले. गगन व ज्‍योतीला विजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT