Cloth Market esakal
नाशिक

Ramzan Festival : गांधी कपडा मार्केट बनले रमजानच्या खरेदीचे केंद्र! खरेदीसाठी महिलांची रेलचेल

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : रमजाननिमित्त येथील किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, अंजुमन चौक यासह शहरातील लहान-मोठ्या बाजारपेठा गर्दीने फुलू लागल्या आहेत. यातच गांधी कपडा मार्केट अल्पावधीतच उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे.

विशेषतः या बाजारात स्वस्तात मस्त व टिकाऊ कपडे मिळतात. महिलांची खरेदीसाठी रेलचेल असते. त्यामुळे गांधी कपडा मार्केट रमजान खरेदीचे केंद्र बनले आहे. (Gandhi cloth market become shopping center of Ramzan Festival nashik news)

शहरात महिलांसाठी अंजुमन चौक, गांधी मार्केट येथे रमजान निमित्त विशेष बाजार भरतात. गांधी मार्केट पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे. हा बाजार सुरवातीला मीटरच्या कापडापासून भरत होता. येथे मीटरवर मिळणारे कापड विकले जात होते. कालांतराने शहराची परिस्थिती बदलता बाजारातही बदल झाले आहेत.

येथे कपड्यांची साडेतीनशे दुकाने आहेत. एकच बाजारात महिलांना रेडिमेड, कच्चे कपडे, स्कार्प, बुरखा, इअरिंग, बांगड्या, काटे आदी वस्तू येथे मिळत असल्याने नागरिक खरेदीसाठी मालेगावच्या गांधी मार्केट गाठतात. या बाजारात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांचे कपडे, चप्पल, बूट एकाच दालनात सर्वच वस्तू मिळत असल्याने नागरिक या बाजाराला पसंती देतात.

येथील बाजाराची स्वस्तात टिकाऊ कपडे मिळत असल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, भुसावळ, नगर, बीड, जालना, संगमनेर या भागातील महिला भगिनी कपडे खरेदीसाठी येतात. बाजारात दोनशे रुपयापासून ते साडेतीन हजारापर्यंत कपडे मिळत आहेत. कॉटन, पॉलिस्टर, रिवन कॉटन, फिरदोस जॉरजेट, फॉक्स जॉरजेट आदींसह विविध प्रकाराचे कपडे येथे मिळतात.


हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यात फॉक्स जॉरजेटला महिला सर्वात जास्त पसंती देतात. बाराही महिने या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गांधी मार्केटमध्ये कपड्यांचे वेगवेगळे प्रकार व डिझाईन जास्त असल्याने खरेदीसाठी महिलांचे आवडते केंद्र बनले आहे.

रमजान महिन्याच्या पाश्‍र्वभूमीवर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कपड्यांमध्ये ३० ते ४० टक्केपर्यंत वाढ झाली आहे. भाव वाढ झाली तरी रमजानमुळे विक्रीवर परिणाम झाला नसल्याचे कापड व्यापारी फारुक शेख यांनी सांगितले.

खरेदीसाठी मालेगावला पाहुण्यांची मांदियाळी

रमजान महिन्यात उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील नागरिक येथे कपडे खरेदीसाठी येतात. शहरात मुस्लीम बहूल असलेल्या पूर्व भागात सध्या रमजानच्या खरेदीमुळे पाहुण्यांची मांदीयाळी पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT