(शाळेने वर्धापन दिनासाठी अर्धे पान जाहिरात दिली होती. कृपया सविस्तर वृत्त फोटो सह प्रसिद्धीस विनंती)
---
छायाचित्र- 07363
सटाणा : जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापिका साधना माळेकर, के. पी. मोरे, श्रीमती एम. बी. सोनवणे, एम. आर. पाटील, डी. पी. रौंदळ आदी.
जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड देत येथील ‘मविप्र’च्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी व शिक्षकांनी शुक्रवारी (ता. २) परिसरात स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधींना अभिवादन केले. यानंतर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली.
मुख्याध्यापिका साधना माळेकर अध्यक्षस्थानी होत्या. पर्यवेक्षक के. पी. मोरे, श्रीमती एम. बी. सोनवणे, एम. आर. पाटील, डी. पी. रौंदळ प्रमुख पाहुणे होते. गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. माळेकर यांनी विद्यार्थिनींनी गांधी व शास्त्री यांची आदर्श मूल्ये आपल्या जीवनात आचरणात आणावीत. शास्त्रीजींनी सीमेवर अहोरात्र लढणारे जवान व शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले असून, गांधीजींनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने जगाला नवी दिशा दिल्याचे स्पष्ट केले. व्ही. बी. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. जान्हवी पगारे व तनिष्का खैरनार या विद्यार्थिनींनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वावलंबन व स्वच्छतेचे विचार आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनशैली बनावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. डी. टी. पगार यांनी संयोजन केले. व्ही. ए. खैरनार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.