नाशिक

महात्मा गांधी आणि बहादूर शास्त्रींना जिल्हाभरात अभिवादन

CD
(पान ३ ला ॲंकर) ---------- महात्मा गांधी, शास्त्री यांच्या विचारांचा जागर! जिल्हाभरात जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान, वक्तृत्व स्पर्धांसह विविध कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने महापुरूषांच्या विचारांचा जागर करण्यात आला. या वेळी स्वच्छता अभियान, वक्तृत्व स्पर्धा यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. --------- फोटो : NSK26H31516 नंदरबार : जयंती सोहळ्यास उपस्थित प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, पर्यवेक्षक विलास पाटील आदी. ---------- यशवंत विद्यालयात नाटिकेचे सादरीकरण नंदुरबार : नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, पर्यवेक्षक विलास पाटील होते. पुष्पेंद्र रघुवंशी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, कार्यपद्धती, सत्य आणि अहिंसा याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर आधारीत नाटिका सादर केली. संगीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. योगेश सोनार, अमोल आव्हाड, विशाल भट यांनी प्रास्ताविक केले. दीपक वाणी यांनी आभार मानले. सोनिया पाडवी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ------------- फोटो : NSK26H31510 कोठली : प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य एस. टी. माळी, डॉ. प्रदीप पाटील आदी. -------- महापुरूषांच्या कार्याला उजाळा नंदुरबार : तालुक्यातील कोठली खुर्द येथील के. डी. गावित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य एस. टी. माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. एस. टी. माळी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंगांची माहिती दिली. डॉ. प्रदीप पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा मार्गाचे महत्व सांगितले. एस. सी. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. आर. साळुंखे यांनी आभार मानले. ----------------- फोटो : NSK26H31504 नंदुरबार : अभिवादन सोहळ्यास उपस्थित शिरीष चौधरी, अनिल चौधरी, सुरेंद्र पाटील, चेतना चौधरी, रुपेश चौधरी आदी. ----------- महापुरूषांच्या देशभक्तीवर प्रकाश नंदुरबार : येथील सहकारमहर्षी श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली. माजी आमदार शिरीष चौधरी, मुख्याध्यापक अनिल चौधरी, सुरेंद्र पाटील, चेतना चौधरी, रुपेश चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिरीष चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षक सुधाकर सूर्यवंशी, उज्ज्वला चौरे, नितीन साळी, गणेश पवार, हितेश चव्हाण, जितेंद्र चौधरी, रवींद्र चौधरी व सुधाकर ठाकूर उपस्थित होते. अमोल भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल चौधरी यांनी आभार मानले. --------------- फोटो : NSK26H31503 नंदुरबार : माल्यार्पण करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी, मनोज रघुवंशी, प्रा.डॉ. एम. जे. रघुवंशी, डॉ. एम. एस. रघुवंशी आदी. --- पाटील महाविद्यालयात महापुरूषांना अभिवादन नंदुरबार : जी. टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि गो. स. मराठे यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी, समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, प्राचार्य डॉ. के. एस. चौधरी, प्राचार्य पी. जे. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, डॉ. एस. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा. डी. ए. पाटील उपस्थित होते. डॉ. उपेंद्र धगधगे, डॉ. डी. एस. पाटील, डॉ. मनोज शेवाळे, प्रा. पी. सी. भील, प्रा. मोईन शेख, प्रा. हर्षबोध बैसाने यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ------------

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

Bharadi Death News: भराडीत दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

Latest Marathi News Live Update : सर्वोच्च न्यायालयाचे राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

आरोपींनी शिव्या, दवाखान्यात नेण्याचं नाटक, पुर्णेकरांच्या हत्येचा कट रचणाऱ्याचा भंडाफोड..

SCROLL FOR NEXT