नाशिक

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल

CD
ॲंकर शहर टुडे पान तीनवर तळापासून वरपर्यंत पाच ते सात कॉलम घ्यावे ----------- NSK26H31167 जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी निघालेल्या अहिंसा सद् भावना शांती रॅलीत सहभागी खासदार स्मिता वाघ, महापाैर दीपमाला काळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महापालिकेचे आयुक्त आदित्य जिवने आदी. -------------- फोटो क्रः NSK26H31168 जळगाव : महात्मा गांधी उद्यानात ‘भारत की संतान’ हा विविधतेतून एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम सादर करताना युवक-युवती. ------------- फोटो क्रः NSK26H31169 जळगाव : महात्मा गांधी उद्यानातील कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे व मंचावर मान्यवर. --------- गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल ------ जिल्हाधिकारी : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अहिंसा सद्‌भावना रॅली सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : सध्या जगात संघर्ष, अस्थिरता, परस्परावलंबित्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या अहिंसा, शांतता व सद्‌भावनेच्या विचारांची गरज आहे. स्वदेशी, स्वच्छता, ग्रामविकास, पारंपरिक व्यवसायांचे जतन, श्रमदान व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार करूनच सुजाण नागरिक म्हणून सक्षम पिढी घडेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.२) गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे शहरातून काढण्यात आलेल्या अहिंसा सद्‌भावना शांती यात्रेच्या समारोपप्रसंगी जिल्‍हाधिकारी घुगे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापालिकेचे आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक अधिकारी सौरेश सहाय, प्रांत अधिकारी योगेशकुमार मीणा, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, राजेंद्र मयूर, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन उपस्थित होते. यावेळी खासदार वाघ यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. अहिंसा सद्‌भावना शांती यात्रा लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अहिंसा सद्‌भावना शांती यात्रेला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात झाली. नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. केशव बळीराम हेडगेवार चौकमार्गे जाऊन गांधी उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सुतीहार अर्पण करून सांगता झाली. यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी भारत माता, कस्तुरबा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासह महापुरुषांच्या वेषभूषेत सहभाग घेतला. बैलगाडीवरील चरख्यावर अखंड सुतकताई करण्याची सजीव आरास आकर्षण ठरली. अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ''गांधीजी कें बंदर हम'' गीत अभिनयासह सादर केले. शुभदा नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थम अथांग जैन, लिटसा जैन, आरव जैन, अनायशा बन्सल, रचित राजपूत यांचा यात समावेश होता. गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान महात्मा गांधी जयंती निमित्ताने आयोजित गांधीतीर्थ जिल्हास्तरीय सामूहिक देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे याप्रसंगी पारितोषिक वितरण झाले. ग्रामीण व शहरी भागातील एकूण २६ संघ सहभागी होते. जिल्ह्यात प्रथम क्रमांक शानभाग विद्यालयाने पटकावला. त्यांना ११ हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण विभागातून धनाजी नाना माध्यमिक विद्यालय (खिरोदा) यांनी प्रथम, विरवाडे (ता.चोपडा) येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या संघास द्वितीय, तोंडापूर (ता.जामनेर) येथील र. सु. जैन विद्यालयाला तृतीय, तर वावडदा (ता.जळगाव) येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. शहरी विभागात ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलला प्रथम, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय, अनुभूती इंटरनॅशनल स्कूल शिरसोली रोड, जळगावला तृतीय क्रमांक, तर काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT