नाशिक

गांधी तीर्थ : पर्यटनातून विचारांची समृद्धी

CD
निसर्ग पर्यटन ---- NSK26H31659 जळगाव : जैन हिल्सच्या नयनरम्य परिसरातील गांधी तीर्थाचे विहंगम दृष्य. ---- NSK26H31660 जळगाव : गांधी तीर्थ परिसरातील महात्मा गांधींचा पुतळा. ------- NSK26H31661 (किशोर कुळकर्णी) गांधी तीर्थ : पर्यटनातून विचारांची समृद्धी गांधी तीर्थ युवकांसाठी प्रेरणास्थान ठरावे या उद्देशाने जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनी गांधीतीर्थाची निर्मिती केली. त्याचा लोकार्पण सोहळा २५ मार्च २०१२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाला. संग्रहालय, ग्रंथालय आणि प्रदर्शन यांद्वारे युवकांना गांधीजींच्या जीवनकार्याची ओळख करून दिली जाते. - किशोर कुळकर्णी, जळगाव जळगावच्या पर्यटन नकाशावर सातपुडा, अजिंठा, पाटणादेवी, उनपदेव आणि किल्ल्यांइतकेच महत्त्वाचे नाव म्हणजे गांधी तीर्थ. पर्यटन म्हणजे केवळ निसर्गरम्य स्थळे पाहणे नव्हे, तर एखाद्या प्रदेशाची विचारधारा आणि संस्कृती समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच भूमिकेतून जैन हिल्सवरील गांधी तीर्थ जळगावच्या पर्यटनाला एक वेगळी, वैचारिक ओळख मिळालेली दिसते. ज्येष्ठ विचारवंत भवरलाल जैन यांनी गांधी तीर्थची निर्मिती केली. येथे उभारलेले ‘खोज गांधीजी की’ हे मल्टिमीडिया संग्रहालय महात्मा गांधींचे जीवन आणि कार्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उलगडते. टचस्क्रीन, डिजिटल पुस्तके, थ्री-डी मॅपिंग, म्युरल्स आणि ॲनिमेशनसारख्या अत्यंत प्रभावी आणि प्रवाही संवादात्मक माध्यमातून गांधीजींचा संपूर्ण जीवनप्रवास अवघ्या दोन अडीच तासांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये मांडला जातो. त्यामुळे हे ठिकाण केवळ संग्रहालय न राहता विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी अनुभवातून शिकण्याचे जणू विद्यापीठच बनले आहे. संग्रहालयाबरोबरच येथील ग्रंथालय आणि अभिलेखागार हे संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. गांधी विचार, इतिहास, समाज, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या विषयांवरील अभ्यासाला येथे चालना दिली जाते, ज्याचा लाभ देशभरातील आणि विदेशातील अभ्यासकांना देखील होतो. या सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्याबरोबरच गांधी तीर्थाचा आर्थिक पैलूही दुर्लक्षित करता येणार नाही. येथे येणारे पर्यटक स्थानिक वाहतूक, भोजन, निवास आणि मार्गदर्शक सेवांचा आधार घेतात. संग्रहालयातील केंद्रात पुस्तके, खादी वस्त्रे आणि हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असल्याने गांधी विचारांचा प्रसार करतानाच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठही मिळते. शाळा-महाविद्यालयांच्या सहली, शैक्षणिक शिबिरे आणि ‘मोहन ते महात्मा’ यांसारख्या फिरत्या प्रदर्शनांमुळे तसेच शाळा शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या गांधी विचार परीक्षा या माध्यमांतून देशभरातील विद्यार्थी व अभ्यासक जळगावकडे आकर्षित होऊ लागले आहेत. यातून येथे ‘विचार पर्यटन’ किंवा ‘ज्ञान पर्यटन’ ही नवी संकल्पना रुजण्याची प्रक्रिया सुरू होते. अजिंठा, पाटणादेवी, उनपदेव आणि पद्मालय यांसारख्या स्थळांशी गांधी तीर्थाला जोडल्यास एक व्यापक पर्यटन परिपथ उभा राहू शकतो. पर्यटकांचा मुक्काम वाढला, की त्याचा थेट फायदा हॉटेल्स, भोजनालये आणि छोट्या व्यावसायिकांना मिळतो. गांधीजींच्या विचारांत ग्रामविकास आणि स्वावलंबनाला केंद्रस्थान होते. त्याच भावनेने गांधी तीर्थाभोवतीचे पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेशी जुळले, तर जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने जळगावला केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक विकासाची नवी दिशाही मिळेल. पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना खानदेश म्हटले की, डोळ्यांसमोर येतात सातपुड्याच्या रांगा, तोरणमाळचा निसर्ग, उनपदेवचे गरम पाण्याचे झरे, पाटणादेवीचा इतिहास, किल्ले, प्राचीन लेणी, धार्मिक स्थळे आणि आदिवासी जीवनाची समृद्ध परंपरा. मात्र या सर्व पर्यटनसंपदेचे एका व्यापक पर्यटन अनुभवात रूपांतर करण्याचे आव्हान आहे. पर्यटन केवळ स्थळदर्शनापुरते मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे साधन कसे बनेल, याबाबत पर्यटन संचालनालयाचे प्रयत्न असल्याचे नाशिकच्या पर्यटन विभागातील उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Lift Collapsed: नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना! सात मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; Video Viral

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

Viral Bears: ४ अस्वलांचा पिकअपमध्ये धुमाकूळ! स्नॅक्स अन् बिअरचे कॅन पळवले! VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Marathi News Live Updates : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचा 'जनमहाभियोग'; दिल्लीत भरवली मॉक पार्लमेंट, राहुल गांधींचे असणार अंतिम भाषण

SCROLL FOR NEXT