धुळे : टुडे पान २ साठी..
--
जिल्हा कारागृहात गांधी विचार परीक्षा
--
गांधी तत्त्वज्ञान केंद्रातर्फे आयोजन; पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : जळगावस्थित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र आणि मुंबई सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती सप्ताहानिमित्त जिल्हा कारागृहात ‘गांधी विचार परीक्षा’ व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृत दाभाडे यांनी गांधी वंदना सादर केली. नंतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. संजय ढोडरे यांनी शहर व परिसरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची तसेच मूल्य रुजवणुकीच्या प्रयत्नांची माहिती दिली. या प्रसंगी धुळे कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे, प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, पवन पोद्दार, यशवंत हरणे, नितीन ठाकूर, एम. डी. भदाणे आदींनी बंदीजनांना गांधीजींच्या अहिंसा व सत्य या मूल्यांवर मार्गदर्शन केले. कारागृहातील बंदीजनांसाठी झालेल्या या परीक्षेत हर्ष विभांडीक व भूपेश पाटील यांनी प्रथम, श्रीकांत गुंडाळे व संदीप वेळीस यांनी द्वितीय तर कपिल बागुल व अर्जुन अहिरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या उपक्रमात डॉ. दिनकर पाटील आणि डॉ. मनोहर पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बंदीजनांमधून संदीप वेळीस यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गांधी जीवन चित्रप्रदर्शनीचा उपस्थितांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाला प्रा. भगवान पाटील, डॉ. पापालाल पवार आणि प्रकाश माळी उपस्थित होते. एम. डी. भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्राचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील व प्राचार्य डॉ. पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनात संचालक ढोडरे, रोहिदास साळुंके, अमृत दाभाडे, गणेश गवळी यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.