नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी फोटोसह बातमी आवश्यक

CD
फोटो ओळी-06942 सटाणा ः गांधीगिरी आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे व कार्यकर्ते. साक्री-शिर्डी महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. २९ : साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा ते ठेंगोडा या अवघ्या आठ किलोमीटरच्या अंतरात ४५ ठिकाणी दुभाजक खंडित करण्यात आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. खासगी शाळा, हॉटेल, धाबे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि शेतांकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या अनधिकृत प्रवेश मार्गांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार अपघात होऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (ता. २९) खंडित दुभाजकांना पुठ्ठे लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी केली. दुभाजक खंडित असल्याने अनेक वाहनचालक थेट महामार्गाच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. चार महिन्यांपासून दुभाजक दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी परमेश्वर सुतार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक तारखेनंतर खंडित दुभाजक बंद करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील दुभाजकांवर रिफ्लेक्टर बसविणे आणि झेब्रा पट्टे मारण्याची मागणी करण्यात आली. ही कामे लवकरात लवकर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. खंडित दुभाजक बंद करण्याच्या आश्वासनानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे. अनधिकृत प्रवेशमार्गांमुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या वेळी संदीप भामरे, तुषार वाघ, दिगंबर सोनवणे, अशोक भामरे, आर. टी. सोनवणे, रणधीर मोरे, दादाजी खैरनार आदी उपस्थित होते.

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT