टुडे ३ ॲंकर
NSK26H31208
जळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित गणेश मंडळांच्या स्पर्धेत उत्कृष्ट आरास स्पर्धेचे प्रथम बक्षीस पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्याहस्ते स्वीकारताना आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी.
-----
देखाव्यात आझाद, मिरवणुकीत शनिपेठ मंडळ अव्वल
उपशीर्षक
कार्यकर्त्यांचा जल्लोष; जिल्हा पोलिस दलातर्फे गणराया पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात उत्कृष्ट आरास व शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी गणेश मंडळांना जय गणराया पुरस्कार देऊन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गौरविण्यात आले. उत्कृष्ट आरास प्रकारात आझाद मित्रमंडळ तर मिरवणुकीसाठी शनिपेठ मित्रमंडळास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. आरास स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे, राजेश शिंपी, शरद भालेराव, किशोर सूर्यवंशी, सुनील दाभाडे यांनी तर मिरवणूक स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपअधीक्षक नितीन गणापुरे, दीपक जोशी, राजेश शिंपी यांनी काम पाहिले.
------
चौकट
स्पर्धेचा निकाल असा
उत्कृष्ट आरास
प्रथम : आझाद क्रीडा मित्र मंडळ, द्वितीय : जळगाव जनता सहकारी बँक, तृतीय : दीक्षितवाडी मित्र मंडळ, उत्तेजनार्थ : वज्रेश्वरी गणेश मंडळ, जिद्दी मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, विशेष पारितोषिक : महेश पवार (गडकिल्ले, शनिपेठ मित्र मंडळ)
शिस्तबद्ध मिरवणूक
प्रथम : शनिपेठ मित्र मंडळ, द्वितीय : जय गणेश मंडळ, तृतीय : न्यू अचानक मित्र मंडळ कांचननगर, उत्तेजनार्थ : शिवनेरी मित्र मंडळ जोशीपेठ, बाबा सेवादास मंडळ.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.