नाशिक

बाजारपेठेत नेहमीच वाहतुक कोंडी झोपडपट्टीत अग्नीशमन वाहने पोहोचणे अवघड

CD
वेध प्रभागाचा -------------- प्रभाग क्रमांक ६ (गणेश पेठ, तानाजी चौक, इंदिरानगर, सातपीर गल्ली, खाटीक गल्ली, लाल चौक) अरुंद रस्त्यांमुळे मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी नेहमीचीच सातपीर गल्लीत अग्निशमन वाहन पोहोचणेही कठीण; वीजतारांचा प्रश्नही कायम संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १ ः भिकुसा कॉर्नर ते तानाजी चौक-इंदिरानगर, लाल चौक ते जुनी नगर परिषद, गोठा असा विस्तार असलेल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये मुख्य बाजारपेठ विस्तारलेली आहे. नेहमी गजबजणारा, वाहनांची सर्वाधिक वर्दळ असलेला हा प्रभाग बाजारपेठेतील वाहतूक कोंडीने नेहमीच त्रस्त आहे. झोपडपट्ट्याही अशा की अग्निशमन दलाचे वाहन पोहोचणे मुश्किल असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ................... दाट वस्तीच्या या प्रभागात व्यापारी वर्गाचे वास्तव्य अधिक आहे. शहराचा हा मध्यवर्ती भाग असला तरी अजूनही विविध समस्यांनी ग्रस्त आहे. या प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वावी वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गणेशपेठमार्गे नवीन पूल या मार्गांवर दिवसभर वाहतूक कोंडी होते. आधीच अरुंद रस्ते त्यात वाहनांची ठिकठिकाणी थेट रस्त्यात होणारी पार्किंग यामुळे येथील व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. वाहतुकीच्या समस्येमुळे ग्राहक बाजारपेठेत येईनासे झाले आहेत. अनेकांनी तर मूळ बाजारपेठेतील व्यवसाय शहराबाहेर विस्तारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे. अरुंद रस्त्यांमुळे अडचणी सातपीर गल्लीतील झोपडपट्टीसह इंदिरानगरचा काही भागा असा आहे, की आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाचे वाहन पोहोचणे मुश्किल आहे. या परिसरातील रस्ते रुंदीकरण करणे गरजेचे आहे. झोपट्टीवासीयांची घरे नावावर होण्यासाठी प्रस्ताव दाखल आहे. परंतु हा प्रश्न अजून सरकारदरबारी लटकलेला आहे. पत्र्याची घरे असलेल्या नागरिकांना घराजवळील वीजतारांमुळे पावसाळ्यात धोका पोहोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही. .............. प्रभागासाठी नियोजित प्रस्ताव - झोपडपट्टीतील रस्ते रुंदीकरण - भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ८० लाखांचा प्रस्ताव - सार्वजनिक शौचालयाची सुधारणेचे काम मंजूर - समाज मंदिराची उभारणी - अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण ----------------------- नगरसेवक काय म्हणतात..? शौचालयांच्या कामास सुरुवात प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची सुधारणा हाती घेण्यात आली आहे. दहा दिवसांत कामाला सुरुवात होईल. वीज वाहिन्या भूमिगत करणे, झोपडपट्टी रस्ते रुंदीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. ----- मनोज देशमुख, नगरसेवक रस्ते करून घेणार आहे प्रभागातील अंतर्गत रस्ते, समाज मंदिराची उभारणी करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. ------ लक्ष्मी पवार, नगरसेवक ------------- नागरिकांचे म्हणणे पाणी नियोजन करावे पाण्याच्या नियमित वेळा व दिवस पाळणे खूप गरजेचे झाले आहे. त्याचा त्रास सर्वाधिक आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यासाठी समन्वय ठेवावा. ----- लालजी शेलार, व्यावसायिक, सहकार लेन मूलभूत सुविधा चांगल्या पथदीप, रस्ते, कचरा संकलन ही व्यवस्था सुरळीत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत. ----- विजय गणोरे, रहिवासी, शिंपी गल्ली ----------------- (उद्याच्या अंकात प्रभाग क्र. ७ - जोशी वाडी, कुंभारभट्टी, माकवाडी, वैदूवाडी, एकतानगर) फोटो-23332 १) गणेश पेठेतील रस्त्यातील अशा वाहन पार्किंगमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. फोटो-23334 २) खाटीक गल्लीतील नव्याने बनविण्यात आलेला सिमेंट काँक्रिट रस्ता. ३) फोटो- 23336 मनोज देशमुख ४) फोटो- 23338 लक्ष्मी पवार ५) फोटो- 23340 लालजी शेलार ६) फोटो- 23342 विजय गणोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT