Ganesh Visarjan 2023 Farewell to Ganesh by Marathi people in Detroit USA nashik psl98 esakal
नाशिक

Ganesh Visarjan 2023: अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात मराठीजनांचा गणरायाला निरोप

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Visarjan 2023 : अमेरिकेतील डेट्रॉईट मराठी मंडळाच्या सभासदांनी यंदाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी हर्षोल्हासात साजरा केला. घरांमधून विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. (Ganesh Visarjan 2023 Farewell to Ganesh by Marathi people in Detroit USA nashik)

पर्यावरणपूरक सजावटीसह सवाद्य आरती, अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. भारतातील विविध भागांतून आलेल्या मित्रमंडळींनी अस्सल महाराष्ट्रीयन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. भक्तिगीतांचे सादरीकरण झाले.

हार्मोनिअम, तबला, ढोलक, टाळाची त्यासाठी साथ राहिली. ‘शिलेदार' या मराठी मंडळाच्या ढोलपथकाने विविध ठिकाणी ढोलवादनाद्वारे गणरायाला मानवंदना दिली. नाशिकचा तरुण अभियंता प्रणव औंधकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ढोलवादन केले.

अनंत चतुर्दशीला मिशीगन विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांच्या गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.

ऋतुजा कांबळे, सुरेखा पाटील, संतोष पाटील, हृषीकेश पोतदार, सुरेखा पोकळे, प्रांजली आढाव, सई पोतदार, सारंग विसापुरे, हरेन दोडके, जाई दोडके, साईनाथ जाधव, गौरांग मोदी, एस. उज्ज्वल, सुधीर कोठावदे, वेद आदींचा त्यात सहभाग राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT