ganesh visarjan procession DJ will be seized after crime filed esakal
नाशिक

Nashik Crime: गुन्हे दाखल डीजेंची होणार जप्ती! सहायक आयुक्तांकडे चौकशी; ‘जुलूस’मध्येही वाजला डीजे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असतानाही गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. त्यामुळे सहा मंडळांविरोधात संबंधित पोलीसात गुन्हे दाखल झाले.

तर दुसर्या दिवशी ईद-ए-मिलादच्या जुलूसमध्येही डीजेचा आवाज वाढल्याने दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यता आले आहेत.

दरम्यान सदरील प्रकरणाची चौकशी सहायक पोलीस आयुक्त करीत असून, याप्रकरणात लवकरच पोलिसांकडून डीजेंवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. (ganesh visarjan procession DJ will be seized after crime filed Inquiries to Assistant Commissioner also played in julus Nashik Crime)

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे न वाजविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले होते. पोलिसांच्या आवाहनाला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु प्रत्यक्षात विसर्जन मिरवणुकीतील सहा मंडळांनी डीजे वाजविला.

त्यामुळे  याप्रकरणी भद्रकाली पोलिसात पाच तर नाशिकरोड पोलिसात एक असे सहा मंडळांविरोधात मनाई आदेशाचा भंग तसेच, पर्यावरण संरक्षण कायदा व ध्वनीप्रदूषण नियमन व नियंत्रणअन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी पोलिस ठाण्यांकडून या गुन्ह्यांची माहिती सहायक पोलीस आयुक्तांना दिली आहे. त्यानुसार सहायक आयुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आलेली असून, लवकरच गुन्हे दाखल करण्यात आलेेल्या डीजेचालकांचे डीजे साहित्य पोलिसांकडून जप्त केले जाणार आहेत. तसेच, ज्या गणेश मंडळांनी डीजे वाजविल्या त्या मंडळांच्या अध्यक्षांवरही कारवाई केली जाणार आहे.

जुलूसमध्ये वाजला डीजे

गणेशविसर्जन मिरवणुकीत डीजे वाजल्यानंतर, दुसर्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूस मिरवणूकीतही डीजेचा दणदणाट झाला.

याप्रकरणी हर्शद अरुण अख्तार (रा. राजविकी अपार्टमेंट, सह्याद्री हॉस्पिटलजवळ, वडाळारोड), डीजेचालक ज्ञानेश्वर गणपत श्रावण (रा. निसाका, निफाड), इरफान अनिस अत्तार (३८, रा. सरगम सोसायटी, मदिना चौक, सारडा सर्कल) डीजेचालक ओंकार सुनील चौरे (रा. सुदर्शन कॉलनी, मखमलाबाद नाका) यांच्याविरोधात भद्रकाली पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

"डीजे वाजविल्याप्रकरणी रितसर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात चौकशी होऊन डीजेही जप्त केले जातील."

- डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT