NMC Nashik news esakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : NMCकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. पर्यावरणपूरक उत्सवात नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने स्पर्धा आयोजित केली आहे. (Ganeshotsav 2022 Eco Friendly Ganeshotsav Competition by NMC nashik latest marathi news)

शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास व विसर्जन करणाऱ्या उत्कृष्ट तीन घरगुती आरासची निवड स्पर्धेसाठी केली जाणार आहे. विजेत्यांना रोख स्वरूपाचे पहिले दहा हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपयांचे, तृतीय पारितोषिक तीन हजार रुपयांचे आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांनी स्पर्धेच्या अनुषंगाने शाडू मातीपासून तयार केलेल्या त्यांचे घरातील पर्यावरणपूरक श्री मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक आरास व श्री विसर्जन इत्यादीचे छायाचित्र health.nashikcorporation@gmail.com या संकेतस्थळावर अपलोड करावे. सदर स्पर्धेच्या प्रवेशिका ११ सप्टेंबरपर्यंतच उपरोक्त संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहेत.

त्यानंतर आलेल्या प्रवेशिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. संबंधित विभागीय अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरगुती आरासांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल गठित केलेल्या समितीकडे सादर करतील. प्राप्त अहवालांची पडताळणी करून सदर समिती अंतिम निर्णय घेईल. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पर्धेचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

Velhe Fire : भीषण आगीत चार सख्ख्या भावांची घरे भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT