A magnificent view of the replica of the Sri Ram Temple in Ayodhya by Shri Pratishthan
A magnificent view of the replica of the Sri Ram Temple in Ayodhya by Shri Pratishthan esakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : श्रीराम जन्मभूमी प्रतिकृतीने इंदिरानगर परिसर श्रीराममय

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : श्री प्रतिष्ठानने गणेशोत्सवात साकारलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या हुबेहुब पर्यावरणपूरक प्रतिकृतीने संपूर्ण इंदिरानगर परिसर श्रीराममय झाला आसुन भाविक भक्तिभावाने देखावा पाहण्यासाठी येत आहे.

वडाळा- पाथर्डी रस्त्यालगतच्या मैदानात मंडळाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे. (Ganeshotsav 2022 Sri Ram Janmabhoomi replica in Indiranagar made by shree pratishthan nashik Latest Marathi News)

कुठल्याही प्लॅस्टिकचा वापर न करता १० दिवसात ही प्रतिकृती तयार करण्यात आली. मंदिर तयार करण्यासाठी इंदूर, कोलकता येथील ४० कामगारांनी मेहनत घेतली. यासाठी ५००० मीटर कपडा, ६००० बांबू, १५०० बल्ली, दीड लाख बॉटम पट्ट्या आदी साहित्य वापरण्यात आले.

मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आवारातील भव्य हनुमानाची मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. मंडळातर्फे इंडिया गॉट टॅलेंट, फॅन्सी ड्रेस, चित्रकला, पाककला, निबंध स्पर्धा, रांगोळी, सुदृढ बालक स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच होम मिनिस्टर सारख्या खेळाचे आयोजन करण्यात आले असून दररोज महिलांसाठी पैठणी आणि इतर बक्षीसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दररोज योगगुरू डॉ. प्रज्ञा पाटील, नेत्रदान जागृती शिबिर, भावगीत व भक्तिगीत मैफल, गीत रामायण, श्रीरामाचे कीर्तन आदी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. दररोज गणेशाची महाआरती करण्यासाठी राजीव टाऊनशिप दत्त मंडळ, संत गाडगे महाराज कनोजिया समाज, साई महिला मंडळ, रेड ब्रिगेड, राजसारथी आणि रथचक्र सोसायटी पदाधिकारी, लाइफ मिशन शतायुषी, समर्थ, सन्मित्र, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ, रिद्धी सिद्धी भजनी मंडळ,

स्वानंद योगा ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रॉयल गार्डन महिला मंडळ, पांडव नगरी मित्रमंडळ, संध्या छाया हास्य क्लब, शिक्षक, पत्रकार यांना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील वीरमाता, वीरपिता आणि वीर पत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष जयवंत टक्के, कार्याध्यक्ष गोपाळ आव्हाड, आशिष दाभोळकर, प्रशांत पाटील, भरत शिरसाट, मनीष पाटील, गणेश रत्नपारखी, योगेश देवगडे, परेश पाटील, सतीश यादव, राम बडोदे, उदय बडोदे आदी संयोजन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT