Eco-friendly Ganesha idols made of Shadumati esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना प्राधान्य! ग्राहकांकडून बुकिंगला सुरवात

सकाल वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीला प्राधान्य न देता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बुकिंगनुसार मूर्तिकारांनी काम सुरू केले आहे. (Ganeshotsav 2023 Eco friendly Shadu idols preferred Start of booking from customers Nashik)

शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी साधारण आठ दिवसांचा कालावधी लागतो. गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने मूर्तिकार शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शाडूच्या किमती १८० ते तीनशे रुपयांपर्यंत असून, ५० रुपयांची वाढ झाली आहे. मूर्तीवर सोनेरी व स्कीन कलर सर्वाधिक वापरला जातो. रंगांच्या किमतीतही दुप्पट वाढ झाली आहे.

नऊ इंचांपासून ते अडीच फुटांपर्यंत गणेशमूर्ती बनविल्या जात असून, अडीच ते दहा हजारांपर्यंत मूर्तीच्या किमती आहेत.

घरगुती विसर्जन करणाऱ्यांकडून शाडूच्या मूर्तीला प्राधान्य दिले जात असले तरी पीओपीच्या मूर्ती न वापरता शाडू मूर्तींना नागरिकांनी प्राधान्य द्यावे, त्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे मूर्तिकार सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लालबाग, दगडूशेठ मूर्तीची बुकिंग

शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकार बुकिंगनुसार ग्राहकांच्या पसंतीने मूर्ती बनवून देत आहेत. लालबाग, दगडूशेठ, भारतीय बैठक, बालगणेश आदी मूर्तींची बुकिंग मोठी आहे. विविध गणपतीच्या फोटोनुसारही मूर्तिकार ग्राहकांना मूर्ती बनवून देत आहेत.

मूर्ती पूर्ण करण्यासाठी आठ दिवस

शाडूच्या गणेशमूर्ती बनविल्यानंतर त्या सुकण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. हिटर लावल्यास हा कालावधी चार दिवसांवर येतो. त्यानंतर पाचव्या दिवशी रंगकाम करून पुन्हा रंग सुकविण्यासाठी चार दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे एक मूर्ती बनविण्यासाठी साधारण आठ दिवस लागत असल्याचे मूर्तिकार सांगतात.

"बुकिंगनुसार शाडूच्या नऊ इंचापासून ते अडीच फुटांपर्यंत मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. मूर्ती बनविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागत असून, शाडूच्या मूर्तींना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे." -किरण भोईर, मूर्तिकार

"शाडूच्या लालबाग, दगडूशेठ, भारतीय बैठक, बालगणेश मूर्तींना ग्राहकांकडून प्रतिसाद आहे. फोटानुसारही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असून, यंदा माती, रंगांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे." -पुष्कराज भोईर, मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT