New Balusheth Murthywale's factory in Bunkar Malya, the Bappa with almonds, cashew nuts and veldoda is attracting attention. esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: मँगोपासून ते काजू केसरमिश्रित मोदक! बाप्पांच्या मोदकांचे 12 हून अधिक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पाच्या आवडीच्या मोदकाचे बाजारात १२ हून अधिक प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात मँगो मोदकापासून काजू, केसर आदी प्रकारच्या मोदकांचा समावेश आहे.

पाव किलो मोदकांची ११० पासून २०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. इतर रोजच्या पूजेसाठी लागणारी मिठाई बाजारात उपलब्ध झाली आहे.

मिठाईची खरेदीही केली जात आहे. गणेशोत्सव १९ पासून सुरू होणार असल्याने १७ पासून मिठाईला मागणी वाढणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. (Ganeshotsav 2023 From Mango to Cashew Saffron Modak More than 12 varieties of Bappa Modaks nashik)

गणेशोत्सवात १० दिवस पूजेसाठी वेगवेगळा प्रसाद केला जातो. सकाळ व सायंकाळी पूजा असल्याने अनेकजण वेगवेगळी मिठाई वापरतो. त्यामुळे गणेशोत्सवात मिठाईला मागणी असते. प्रसादासाठी लागणाऱ्या साहित्यांनी मिठाईची दुकानेही सज्ज झाली आहेत.

मागणीनुसारही मिठाई बनवून दिली जात आहे. चॉकलेट फ्लेवर मोदक, स्टॉबेरी मोदक, बटर स्कॉच, गुलकंद, पिस्ता, ऑरेंज मोदक, मलाई मोदक, खवा, मोदक, पायनॅपल मोदक आदी प्रकार उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गोडबुंदी १६० रुपये किलो, मोतीचूर लाडू २८० रुपये किलो, ऑरेंज स्पेशल मोतीचूर लाडू २८० रुपये, बालूशाही २४० रुपये, काजू मिठाई ८०० पासून १२०० रुपयांपर्यंत, जिलेबी १६० रुपये किलो, म्हैसूरपाक २४० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहेत. नेहमी वापरात असलेल्या मिठाईचेही ८ ते १० प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

"यंदा मिठाईचे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. मोदकांमध्येच १२ हून अधिक प्रकार आहेत. याचबरोबर इतर मिठाईला मागणी आहे. गणेशोत्सव १९ पासून असल्याने १७ पासून मोदकांना मागणी असते." - मोहनलाल चौधरी, सागर सम्राट स्वीट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT