Julie the dog bowing to Ganaraya being taken for immersion. In the second photo, Julie sits emotionally beside an empty tent. esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: ‘ज्यूली’च्या गणेशभक्तीने वेधले लक्ष! गणरायाला निरोप देतांना भावूक झाली ज्यूली श्वान

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : दहा दिवसात गणरायाच्या प्रेमात न्हाऊन निघालेले भाविक, लहान बालके विसर्जनाच्या वेळी रडताना आपण बघितले आहेत. मात्र गणरायाचा लळा लागल्याने भावुक झालेली अडीच वर्षाची श्वान ज्यूली वडाळा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या खोडे मळा भागात सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक सुनील माधव खोडे राहतात.

पत्नी संगीता, मुले आनंद आणि ओम या सर्वांनी गणेशाची नेहमीप्रमाणे स्थापना केली. (Ganeshotsav 2023 Julies Ganesha Bhakti got attention Julie dog got emotional while saying goodbye to Ganaraya nashik)

प्रत्येक बाबतीत त्यांची पाळीव श्वान ज्यूलीदेखील आसपास असायची. त्यामुळे गणेशाची सजावट, आगमन हे सर्व ती बघत होती. सकाळची आणि सायंकाळच्या आरतीसाठी नित्यनियमाने तीदेखील उपस्थित राहायची.

इतर जसे हातावर प्रसाद घ्यायचे तसे तेदेखील एका पायाचा पंजा वर करून हातावर प्रसाद घ्यायची. आरती झाल्यावर आरतीवरून पुढचे दोघं पायदेखील हातांप्रमाणे फिरवत डोक्याला लावायची. गुरुवारी कुटुंबीयांनी गणेश विसर्जनाची तयारी केली.

गणेशाला मखरातून उचलले आणि विसर्जनासाठी निघाले असता ज्यूलीदेखील सोबत निघाली. सर्वांनी गणेशाचे दर्शन घेतले तिनेदेखील दोन्ही पाय मूर्तीजवळ ठेवून दर्शन घेतले. विसर्जनानंतर सर्व मंडळी घरी परतली.

मात्र सायंकाळपर्यंत ती बाहेरच बसून होती सायंकाळपर्यंत तिने काही खाल्लेदेखील नाही. रात्री ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती त्या ठिकाणी ती आली आणि तेथेच बसून राहिली.

ज्यूलीच्या गणेशभक्तीची आसपासदेखील चर्चा झाल्याने अनेकांनी आरतीच्या वेळी येथे भेट देत तिची भक्ती बघितली. विसर्जनाच्या वेळी अनेकांनी विशेषतः लहान बालकांनी येथे मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT