Mahant Samvidanand Saraswati of Kailas Mutt and former mayor Ashok Murtadak along with the office bearers of the Mandal during the proper puja. esakal
नाशिक

Nashik Ganeshotsav 2023: केदारनाथ धाम देखावा नागरिकांसाठी खुला; संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते विधिवत पूजन

सकाळ वृत्तसेवा

: पंचवटीतील मखमलाबाद नाका येथील गेल्या ७१ वर्षांपासून विविध धार्मिक आणि सामाजिक देखावे उभारणारे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे कैलास मित्रमंडळ आहे. यंदाचे मंडळाचे ७२ वे वर्ष असून या वर्षी केदारनाथ मंदिराची भव्यदिव्य अशी प्रतिकृती मंडळाकडून उभारण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. १९) सायंकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी कैलास मठाचे महंत संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात विधिवत पूजन करत देखावा नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे.

देखावा बघण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकास रुद्राक्ष प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती, मंडळाने दिली आहे. (Ganeshotsav 2023 Kedarnath Dham spectacle open to citizens Dutifully worshiped by Samvidananda Saraswati nashik)

नाशिक शहरात सजविलेल्या वाहनातून आणण्यात येणाऱ्या आकर्षक गणेशमूर्ती, फुलांची होणारी उधळण, गणेशाच्या मूर्तीची विधिवत स्थापना करताना होणारा मंत्रघोष, गणेशाच्या आरतीचे सूर अशा आनंदाच्या, जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात लाडक्या गणरायाचे पंचवटी परिसरात आगमन झाले.

महंत संविदानंद सरस्वती हे दरवर्षी केदारनाथ मंदिराचे पट उघडण्यास जात असतात, हा मखमलाबाद नाक्यावरील कैलास मित्रमंडळाचा केदारधाम देखावा त्यांच्या हस्ते जनतेला बघण्यासाठी खुला करण्यात आला.

पंचवटीतील कैलास मित्रमंडळ हे स्वतःचे ढोलपथक असलेले एकमेव सार्वजनिक मंडळ आहे. स्थानिक वादकांना प्राधान्य देत ढोल पथकाची सुरवात केली गेली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल पथकाची देखभाल दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून केली जात असून वर्षभर ढोल पथकाचा सराव सुरू असतो.

त्यामुळे मंडळाच्या ढोल पथकात दरवर्षी वादकांची संख्या वाढत आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंडळाची स्वतःची रुग्णवाहिका असून ती परिसरातील नागरिकांच्या सेवेत कायम उपलब्ध करून दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT