Ganeshotsav esakal
नाशिक

Nashik Ganeshotsav 2023: ओम शिवाय नमस्तुभ्यंचा जयघोष! मानाच्या गणपती मंडळांची मिरवणूक यंदा खास

सकाळ वृत्तसेवा

: गणेशोत्सवात अनंत चतुर्थीला बाप्पाला मोठ्या भक्तिभावात निरोप दिला जाणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून विसर्जनाची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे.

यंदा सार्वजनिक मंडळांनी शिवलिंग असलेल्या देखाव्यांवर भर दिला असून, बम बम बोले, ओम शिवाय नमस्तुभ्यं, गणपती बाप्पा मोरयाचाच जयघोष असणार आहे. (Ganeshotsav 2023 procession of Manacha Ganpati mandals special this year nashik)

गणेशोत्सवाला मंगळवारी (ता. १९) मोठ्या थाटात सुरवात झाली. आता गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असून, गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आदी विषयांवर देखावे सादर केले आहे. देखावे पाहण्यासाठी नाशिककरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

आता गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांचे देखावे विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. महिलांचे पथक, पारंपरिक संबळ वाद्य, ढोल-पथकांचा मिरवणुकीत समावेश असणार आहे.

चांद्रयान-३ सह शिवलिंग आदींचा मिरवणूक देखाव्यात आकर्षण असेल. नाशिककरांना यंदा विसर्जन मिरवणुकीत वेगळेपण देण्याचा प्रयत्न सार्वजनिक मंडळांकडून केला जात आहे.

"केदारनाथ शिवलिंग, पंचवटीतील अघोरी पथक मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. महिलांचे लेझीम पथक, पारंपरिक संबळ वाद्य, ढोल-पथकाचा मिरवणुकीत समावेश असेल."

- रोहन पवार, उत्सव समितीप्रमुख, रविवार कारंजा

"नाशिकचा राजा मित्रमंडळाचे महिलांचे झांज पथक विशेष आकर्षण असणार आहे. पारंपरिक पद्धतीने ढोल पथकासह मिरवणुकीत चांद्रयान-३ ची थीम साकारण्यात आली आहे."

- समीर शेटे, संस्थापक अध्यक्ष, नाशिकचा राजा

"युवक मित्रमंडळाचे मिरवणुकीत फुलांचा देखावा सादर होणार आहे. महादेवाची सात फुटांची मूर्ती असेल. फुलांचे त्रिशूळ आणि ओम असेल. दीडशे वादकांचे ढोलपथक, डीजे, बॅन्जो असणार आहे."- किरण मोटकरी, युवक मित्रमंडळ, मुंबई नाका

"सरदार चौक मित्रमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत फुलांनी तयार केलेले शिवलिंग, पशुपतिनाथ मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती, नंदी असणार आहे. ढोल-पथकाचाही समावेश असणार आहे."- योगेश गवळी, सरदार चौक मित्रमंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : आता हिंदू माफ करणार नाही! राम मंदिर गैरव्यहार प्रकरणारून उद्धव ठाकरेंचा संताप, दादरमध्ये रामरक्षा आंदोलन...

farmer loan waiver: इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही; बारामतीत जयंती सोहळ्यात कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची मोठी घोषणा, काय म्हणाले..

'त्याने सिगारेटने मांडीला चटके दिले, कानशिलातही मारली'; नीती टेलरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली तो...

China Dumping: चीनच्या आणखी एका डावावर भारताचा प्रहार! शेतीत वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या आयातीवर मोठा निर्णय, नवे नियम लागू

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री थरार! ट्रक अडवून चालकाला मारहाण, ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला, अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT