Ganeshotsav 2023 esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: श्रींचे वेगळेपण ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू! ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तीवर अखेरचा हात

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच आतुर असून बाजारपेठांमध्ये विविध गणेश स्टॉलमध्ये बुकिंगही सुरू झाले आहे.

यंदा प्रथमच राम मंदिर, सरस्वती, महालक्ष्मी, कोळीवाड्यातील कोळी, शिवशंकर, वीणा हातात घेतलेली मूर्ती, बालगणेश, वेद पाहत असलेले बाप्पा आदी श्रींच्या मूर्तीकडे चिमुकल्यांसह पालकही आकर्षित होत आहे. (Ganeshotsav 2023 Shree uniqueness becomes center of attraction Final touch on he idol as per customer demand nashik)

गणेशोत्सवाला मंगळवारी (ता. १९) सुरवात होत आहे. कच्च्या मालाच्या किमतीसह कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाल्याने यंदा गणेशमूर्ती महागलेल्या असतील. ग्राहकांनीही बाप्पाची मूर्ती बुकिंगला प्राधान्य दिले आहे.

स्टॉलवरही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाला साज देण्यासाठी मूर्तीची आधीच बुकिंग करून घेण्याकडे कल वाढला आहे. बाप्पाची मूर्ती अधिक आकर्षित वाटण्यासाठी सर्वाधिक काम वर्क आणि फिनिशिंगवर केले गेले आहे.

कारखान्यांमध्येही बाप्पाच्या मूर्तींचे काम पूर्णत्वाकडे आले असून मूर्तिकारांची ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तीवर अखेरचा हात मारण्यासाठी लगबग सुरू आहे. सात इंचापासून उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून रात्रंदिवस मूर्ती बनविण्यासाठी कारागिरांनी मेहनत घेतली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही स्टॉलवर परजिल्ह्यातूनही मूर्ती आल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तींचे तीनशेहून अधिक प्रकार ग्राहकांना दालनांमध्ये उपलब्ध असणार आहे, त्यात झाडावर झोका घेत असलेला गणपती, राम मंदिर, सरस्वती, महालक्ष्मी, कोळीवाड्यातील कोळी, शिवशंकर, वीणा हातात घेतलेली मूर्ती, बालगणेश, वेद पाहत असलेले बाप्पा आदी मूर्तींचा समावेश आहे.

"पंधरा दिवसांआधी काम पूर्ण झाले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तीवर अंतिम हात मारण्याचे काम सुरू आहे. यंदा चारशे मूर्ती पूर्ण केल्या आहेत." - खिमा बावरी, मूर्तिकार

"मूर्तीवर वर्क आणि फिनिशिंग यावर सर्वाधिक काम करण्यात आले आहे. मूर्तींचे तीनशे प्रकार दालनात उपलब्ध आहे. राम मंदिर, सरस्वती, महालक्ष्मी, कोळीवाड्यातील कोळी आदी मूर्तींकडे ग्राहक आकर्षित होत असून बुकिंग करण्याकडे कल आहे."

- तन्मय अमृतकर, व्यावसायिक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT