Sculptor busy with making Ganesha idol esakal
नाशिक

Ganeshotsav 2023 : गणेशमूर्ती साकारण्याच्या कामास वेग! मूर्तींच्या दरामध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्ताने गणेशमूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. सुमारे ८० टक्के मूर्ती तयार झाल्या आहेत, तर ६० मूर्तीची बुकिंग झाली असल्याची माहिती कारागिरांकडून देण्यात आली.

कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने मूर्तींच्या दरांतही वाढ झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. (Ganeshotsav 2023 Speed ​​up work of making Ganesha idol 30 to 40 percent increase in rate of idols nashik)

लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वांमध्ये गणेशोत्सवाचे आकर्षण असते. १९ सप्टेंबरला गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशमूर्ती साकारण्याच्या कामांना वेग आला आहे.

शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. गेले दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवाचा जोर अधिक असणार आहे.

गणेशमूर्तीची मागणी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच मूर्ती साकारण्याच्या कामास प्रारंभ झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, तसेच पगडी, फेटाधारी, टिटोळा आणि पारंपरिक गणेशमूर्तींचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दर वर्षीची मागणी लक्षात घेता सात इंचापासून ते तीन फुटांपर्यंत मूर्ती अधिक प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही महागाईमुळे विविध प्रकारच्या कच्च्या मालाच्या दरांमध्ये २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.

त्याचा परिणाम होऊन मूर्तींच्या दरांमध्ये देखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तयार झालेल्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागातील मूर्ती कारखान्यातील सुमारे ६० टक्के मूर्ती बुकिंग झाल्या आहे. उर्वरित मूर्ती कामांत प्रत्येक कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

"यंदाही कच्च्या मालाच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बहुतांशी मूर्ती तयार झाल्याने त्यांची बुकिंग सुरू झाली आहे." -नितीन परदेशी, मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT