Voice over job
Voice over job esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: ‘व्हाईस’चे काम मिळाले पण दाम मिळेना! कलाकारांची स्थिती

तुषार महाले

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या महिनाभराआधी बाप्पाच्या गाण्यांसाठी संगीतकार, गीतकार, देखाव्यातील विविध पात्रांसाठी व्हाइस आर्टिस्ट यांच्या कामाची लगबग सुरू असतं. आता लगबग संपुष्टात आली असून एका देखाव्यांच्या स्क्रिप्टवर अनेक मंडळाचे देखावे चालतात.

त्यामुळे व्हाइस आर्टिस्टचे काम कमी झाले आहे. गणेशोत्सवात व्हाईसचे कामही मिळाले तरी हवा तसा मोबदला मिळत नसल्याने नाशिकमधील व्हाइस आर्टिस्टची पावले मुंबई, पुण्याकडे वळाली आहेत. (Ganeshotsav 2023 voice over jobs not fulfilling for money Status of actors nashik)\

गणेशोत्सवात पौराणिक, ऐतिहासिक, चालू घडामोडी, सामाजिक प्रबोधन करणारे विषय असतात, विषयांची स्क्रिप्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यासह इतर शहरांमधूनही नाशिकचे व्हाइस आर्टिस्टकडे विचारणा सुरू झाली आहे.

गणेशोत्सवात पहिल्या तीन दिवसांत नागरिकांची देखावे बघण्यासाठी गर्दी कमी होते त्यानंतर गर्दी वाढत जाते. पहिल्या दिवशी देखावे सादर करणारे मंडळेही नाशिकमध्ये खूप कमी आहे.

तो नियम लागू होत नाही. गणेशोत्सवात अनेक मंडळे व्हाइस आर्टिस्टकडून देखाव्यासाठी विविध पात्रांसाठी कामे करून घेतात. या मंडळांकडून या पात्रांना दिलेला आवाज पुढे कुठलेही मंडळ वापरताना दिसते.

त्यामुळे एकदा आवाज रेकॉर्ड झाल्यानंतर आर्टिस्टकडे कॉपीराइटचा नियम लागू होत नाही त्यामुळे कोणीही आक्षेप घेत नाही. या परिस्थितीत आर्टिस्टचे कामच कमी होताना दिसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्हाइस आर्टिस्ट टिकण्याची आशा

गणेशोत्सवात वेगवेगळ्या पात्रांना आवाज दिले जातात. गायकांना कॅसेटच्या माध्यमातून गणपती गाण्यांच्या अल्बमचे रेर्कोडिंग करण्याची संधी मिळायची.

आता ही संख्या कमी झाली आहे. चांगले मोबाईल, माईक आल्याने मंडळातील पदाधिकारी स्वत: रेकोर्डिंग करून घेतात. देखाव्यांमधील पात्रांना एआय टेक्नॉलॉजीचा आवाज दिला जाणार नाही, त्यामुळे कलेचे दैवत गणपती व्हाइस आर्टिस्ट टिकेल अशी आशाही आर्टिस्टला आहे.

"गणेशोत्सव आल्यावर आर्टिस्टला विविध पात्रांमध्ये आवाज देण्यापासून रांगेत उभे असलेल्या भक्तांना सूचना देण्यापर्यंत असे प्रचंड काम असायचे. समाजात जनजागृती करण्याचे काम व्हाइस आर्टिस्टकडून होते, मात्र ते काम कमी झाले आहे. एआय गणेशोत्सवातील विविध पात्रांना आवाज देऊ शकणार नसल्याने आर्टिस्ट टिकेल अशी आशा आहे."- उन्नती जगदाळे

"गणेशोत्सवात कामांची विचारणा सुरू झालेली आहे. नंदुरबार, नगर, मुंबईतील मंडळाचे काम चालू आहे. डी.जे., कॉपी-पेस्‍टच्या जमान्यात अस्सल पारंपारिक गणपती गीते, देखाव्यातील त्या पात्रांना दिला जाणारा आवाज, त्यातून मिळणारे काम हरपले आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वरूप बदलले आहे." - संजय गिते

"गणेशोत्सवात अनेक मंडळ व्हाइस आर्टिस्टकडून देखाव्यासाठी काम करतात, दुसऱ्या वर्षी ओळखीतील मंडळाला व्हाइस क्लिप दिली जाते. त्यामुळे ते एक काम कमी होते. तो आवाज वारंवार वापरूनही कॉपीराइट आर्टिस्ट करू शकत नसल्याने आक्षेप घेता येत नाही. नाशिकचे व्हाइस आर्टिस्ट मोबदला कमी मिळत असल्याने पुणे, मुंबईकडे वळाले आहेत."

- अनुराधा मटकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT