Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: भगूरला घरात घुसून टोळक्याचा धुडगूस; प्रेमविवाहातून घडलेल्या प्रकारात 9 संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : भगूर परिसरातील लोकमान्य टिळकपथ या ठिकाणी टोळक्याने एका घरात घुसून धुडगूस घालत घर जाळून टाकण्याची धमकी दिली.

प्रेमविवाहाच्या घटनेने संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांतील ९ संशयितांना पोलिसांनी अटक करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gang broke into Bhagur house 9 suspects arrested in case of love marriage Nashik Crime news)

गोरख कर्पे, निशा कर्पे, गणेश सुरेश व्यवहारे, करण वाघचौरे, फकिरा कर्पे, शंकर कर्पे, श्याम कर्पे, शुभम कर्पे व अक्षय मोहन वाघचौरे (सर्व रा. भगूर ता. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मंगल अशोक लकारिया (रा. टिळक पथ, भगूर) यांच्या फिर्यादीनुसार, ३ जुलैला त्यांचा मुलगा अमोल लकारिया याने संशयितांपैकी एकाच्या १९ वर्षीय मुलीशी कोर्टात प्रेमविवाह केला.

या विवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान, दोघांनी विवाह केल्यानंतर एक आठवडा गावात राहण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास मंगल, त्यांचे पती, मुलगा, सून व मुली घरी असताना संशयित गोरख कर्पे, त्याची पत्नी व इतर नातेवाइकांनी लकारिया यांच्या घरी आले आणि त्यांनी मुला-मुलीला बघायचे असल्याचे म्हणत, त्यांच्या दरवाजाला लाथ मारुन घरात शिरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या वेळी संशयितांनी लकारिया कुटुंबास शिवीगाळ करीत मारहाणही केली. घरातील कपाटाच्या काचा फोडल्या. दुचाकीचे नुकसान केले. तसेच, दमदाटी करीत घर जाळून टाकण्याची धमकी दिली.

दीर योगेश लकारीया तसेच नागरिकांनी सदर वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच, देवळाली कँम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पी. के. गिते, हवालदार राजेंद्र गुंजाळ घटनास्थळी दाखल झाले.

फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने संशयितांची जामीनावर मुक्तता केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हवालदार गुंजाळ तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT