नाशिक

गंगा, गोदावरी आणि गौतम ऋषींच्या मूर्तींचे दर्शन

CD
पान-२ फोटो : ३४२३३,३४ नाशिक : गोदाकाठावरील दर बारा वर्षानी उघडलेले गोदावरी मंदिर. दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी लागलेली रांग. ----------------- ३६-२ गंगा-गोदावरी मंदिर बारा वर्षांनंतर खुले गंगा, गोदावरी आणि गौतम ऋषींच्या मूर्तींचे दर्शन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१ : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तब्बल बारा वर्षांनंतर रामतीर्थाच्या उत्तरेस असलेले ऐतिहासिक श्री गंगा- गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. शनिवारी (ता.३१) धर्मध्वजारोहणाच्या मुहूर्तावर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. सिंहस्थ पर्वाच्या कालावधीत देशभरातून येणाऱ्या भाविकांना या मंदिरातील प्राचीन मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. ------------- गोदावरीच्या धार्मिक माहात्म्याशी जोडलेले हे मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे विशेष महत्त्वाचे मानले जाते. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात गंगा माता, गोदावरी माता आणि गौतम ऋषी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गोदावरीच्या अवतरणाशी संबंधित पौराणिक कथांमुळे या मंदिराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराला सुमारे सातशे वर्षांची परंपरा आहे. १७७५ मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी मंदिरात सभामंडप उभारून दिल्याची ऐतिहासिक नोंद आहे. पूर्वी गौतम ऋषींची मूर्ती उघड्यावर असल्याने ऊन-पावसाचा मारा सहन करावा लागत होता. सभामंडपामुळे मूर्तींचे संरक्षण होण्यास मदत झाली. यंदाच्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात रंगरंगोटी, फरश्यांची दुरुस्ती आणि पाणीगळती रोखण्याची कामे करण्यात आली आहेत. बारा वर्षांनंतर मिळणाऱ्या या दर्शनपर्वामुळे रामकुंड परिसरातील धार्मिक वातावरणात भर पडली आहे. -------- १६-१ चौकट कुंभपर्वाशी जोडलेली परंपरा या मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य़ म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातच ते दीर्घकाळ दर्शनासाठी खुले केले जाते. कुंभपर्व संपल्यानंतर मंदिर पुन्हा बंद ठेवले जाते. अन्य काळात गंगा दशहरा आणि त्रिपुरी पौर्णिमेला विशेष पूजेसाठी मंदिर उघडले जाते. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Pune Solapur Highway: कदमवाकवस्तीत सेवा रस्त्यालगत कचरा; अपघातांचे सत्र अन् साथीच्या आजारांचा धोका, नागरिक संतप्त

Latest Marathi News Update : नागपुरातील ८ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; प्रत्येकी १० लाखांच्या खंडणीची मागणी, अभिनेता टायगर श्रॉफच्या उदाहरणाचा धाक

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT