मेन फिचर
NSK26H32554 : संग्रहित छायाचित्र.
---
रस्त्यावर कचरा तरी संकलनात १०० टनांची घट
पूर्वी दररोज ३०० ते ३२५ टन कचऱ्याची नोंद; हस्तांतरित केलेल्या ३८ गाड्या बंद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : शहरातील दैनंदिन कचरा संकलनाच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून येत असून, या फरकाची कारणे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी खासगी वजनकाट्यावर दररोज सरासरी ३०० ते ३२५ टन कचऱ्याची नोंद होत होती. मात्र, ऑगस्टपासून महापालिकेचा वजनकाटा कार्यान्वित झाल्यानंतर दररोज सुमारे २०० टन कचऱ्याची नोंद होत आहे. त्यामुळे दोन्ही नोंदींमध्ये सरासरी १०० टनांचा फरक दिसत आहे. तसेच महापालिकेच्या मालकीच्या बीव्हीजी कंपनीला हस्तांतरीत केलल्या १०५ गाड्या सुरू तर ३८ गाड्या बंद असल्याचे समोर येत आहे.
महापालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा मक्ता बीव्हीजी कंपनीला दिला आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेताना घंटागाड्यांची उपलब्धता, कचरा संकलनाची आकडेवारी आणि कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा मुद्दा समोर आला. शहरात कचरा संकलनासाठी एकूण १०५ घंटागाड्या असून, त्यापैकी सुमारे ८० ते ८३ गाड्या कार्यरत आहेत. तर ३८ गाड्या बंद असल्याची माहिती आहे. सर्व वाहनांची सद्यःस्थिती तपासून बंद गाड्या दुरुस्त करणे आणि कचरा संकलनाचे नियोजन सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावर कचर्याचे ढीग
शहरातील अनेक भागात तसेच बाजारपेठ परिसरात कचर्याचे ढीग पडून आहे. हे कचर्याचे ढीग लवकर उचलले जात नसल्याने कचरा तसाच पडून असल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यात दिवाळीत कचर्यात वाढ होत असते, त्यामुळे बंद वाहने सुरू करून तसेच रस्त्यावरील साचलेला कचरा संकलनाचे काम बीव्हीजी कंपनीकडून अधिक चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे.
बायोमेट्रिक हजेरी घेतली नाही
स्वच्छतेचा मक्तामधील कराराच्या अटींनुसार सप्टेंबर २०२५ पासून कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सादर करणे अपेक्षित होते. मात्र, ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही हजेरी बीव्हीजी कंपनीकडून सादर झाली नसल्याची माहिती बैठकीत समोर आली. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी तत्काळ कार्यान्वीत करण्याबाबत सूचना मपनाने बीव्हीजी कंपनीला दिल्या आहे.
‘बीव्हीजी’कडे ताब्यात असलेल्या वाहनांची स्थिती..
वाहने..................संख्या..........चालू........बंद
घंटागाड्या............१०४...........८३.......२१
कॉप्मक्टर.............१३............०८.......०५
डंम्पर.................०६.............०३.......०३
पिकअप...............०९.............०५.......०४
स्किपलोडर...........०३.............००.......०३
फ्रंटलोडर..............०४............०२.......०२
ट्रॅक्टर.................०४............०४........००
कोट..
शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर कोणत्याच प्रकारे तोडजोड केली जाणार नाही. बीव्हीजी कंपनीला कामात सुधारणा करण्यासाठी वेगवेळ्या गोष्टी सूचविल्या असून त्यावर त्यांनी तत्काळ अमंलबाजवणी करणे आवश्यक आहे. रस्त्यांवरील साचलेला कचरा उचलण्याचे कामाला प्राधान्याने त्यांनी उचलावे.
- आदित्य जिवने, आयुक्त. महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.